Posts

Showing posts from May, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
परफेक्शनची सुट्टी माझा परफेक्शनीस्ट मित्र सुनील याला मी विचारले, तुझा दिवस कसा सुरु होतो? त्याने ताबडतोब उत्तर दिले.. व्यायाम!! मी म्हणालो, उत्तम! कसा करतोस व्यायाम? त्याच्या उत्तरादाखल त्याने सांगितले, अरे बाबा, त्यासाठी मी जवळपास एक लाख रुपये खर्च केलेत. डायटेशीयन आणि हेल्थ इन्सट्रक्टरची फी, तीस हजार रुपयांची सायकल, फिटनेस मॉनीटर करण्यासाठी ॲपल वॉच. ते मला माझ्या कॅलरीज, हार्टरेट, ब्लड शुगर याबाबत सारखे रीडींग देते. मी त्या अॅपल वॉचच्या आधारे परफेक्ट फिटनेस मेंटेन करतो. रोज सकाळी सायकल चालविणे जॉगींग करणे हे नियमाने सुरु असते. त्यात खंड नाही. माझे ॲपल वॉच माझ्या आय पॅडशी इंटीग्रेटेड असल्याने माझ्या हेल्थचे ग्राफीकल चार्टस् माझ्या आयपॅडमधे आताही आहेत मी दाखवू शकतो. मी त्याला म्हणालो, सुनिल रोज व्यायाम केला पाहिजे हे तर मान्यच आहे परंतू रोज सकाळी उठतोस तर एखाद्या दिवशी, सुंदर हवा सुटलेली असते, पहाटेच्या वेळी गार वाटणारी ती हवा आपल्या शरीराचा रोम रोम रोमांचित करीत असते. अश्यावेळी व्यायाम आणि सर्व ॲप वगैरे बाजूला ठेऊन शांतपणे रस्त्यातीलच एखाद्या बेंचवर बसून थंडगार हवा खाऊन बघितली आहेस

दै. तरुण भारत नागपूर मधे आज प्रकाशित झालेला माझा लेख

एक नवी कल्पक गुंतवणूक पहाटे वॉकला जाताना मी फ्लाय ओव्हरवरुन जात होतो. नेहेमीचा रस्ता असल्याने परीचित मंडळींच्या भेटी झाल्या. पण त्या दिवशी एक वेगळा प्रकार मला बघायला मिळाला. माझ्या बाजूने दोन वीशीतले तरुण गाडी चालवित जरा पुढे गेले. त्यांनी काही अंतरावर गाडी लावली. पुलावर अशी गाडी थांबविल्याने माझ्या मनात जरा कुतुहल निर्माण झाले. त्या दोघांनीही आपापल्या बॅग्जमधून कॅमेरे बाहेर काढले व ते दोघेही उगवत्या सूर्याची छायाचित्रे घेऊ लागले. वेगवेगळ्या अँगलचा, पोझीशन्सचा वापर करुन त्यांनी उगवत्या सूर्याची, आसपास उडणाऱ्या कबुतरांची वेगवेगळी छायाचित्रे काढली. ते दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी होते व आजच्या युवापिढीला शोभणारेच कपडे त्यांनी परीधान केलेले होते. पण दोघांचाही फोटोग्राफीचा सेन्स मात्र खूप चांगला होता हे त्यांच्या चर्चेवरुन जाणवित होते. मी मुद्दाम त्यांच्याजवळ घुटमळलो तेव्हा त्यांनी मला ती सर्व छायाचित्रे दाखविली. मलाही फोटोग्राफीची खूप आवड असल्याने मी त्या सर्व छायाचित्रांचे अवलोकन केले. अप्रतिम छायाचित्रे होती ती. महत्वाचे म्हणजे त्या छायाचित्रांमधील बारीक बारीक गोष्टी ते सांगत होते.

My artilce published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
परफेक्शन "मला कोणत्याही कामात परफेक्शन लागते. माझी ती सवयच आहे. काम कसेही करणे मला सहनच होत नाही. एकतर काम करायला घेऊच नये परंतू जर एकदा जबाबदारी स्विकारली तर मग मात्र ती निटनेटक्या पद्धतीनेच पार पाडली जावी असा माझा आग्रह असतो. काम परफेक्ट झाले की मनाला समाधान लाभते. ठरलेल्या वेळात व साचेबद्ध पद्धतीने कामे जर झाली ना, तर या जगात कोणत्याच प्रकारच्या समस्या राहणार नाहीत. आपल्या देशात कामांमधे परफेक्शन नसल्यानेच सर्व समस्या आहेत. प्रत्येकाला सोपविलेले काम त्याने त्याने परफेक्शनने केले तर कोणतीच अडचण येणार नाही. पण दुर्दैवाने असे होत नाही. लोक माझ्या भावना समजूनच घेत नाहीत. आज मी दीडशेहून अधिक लोकांच्या कार्यलयाचा प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. परंतू मला अपेक्षित रिझल्टस् मिळतच नाहीत. लोक वेळा पाळत नाहीत. वेगवेगळे बहाणे बनवितात, त्यांना मुळात काहीही करायची इच्छा नाही. माझा परफेक्शनचा आग्रह त्यांना दुराग्रह वाटतो. मी चिडतो, रागावतो म्हणून ते कामे करतात परंतू मनातून त्यांना मी जे काही सांगतो ते जाचक वाटत असते. मला काय करावे कळत नाही. या मंडळींच्या या असल्या कॅज्युअल वागण्यामुळे

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
पंपल्सड्रॉप जगभरात सगळीकडे सध्या मंदीचे भयानक सावट आहे. अमेरीका किंवा चीन सारख्या प्रगत देशांना देखील या मंदीच्या काळात चटके सहन करावे लागत आहेत. या मंदीमुळे बाजार कोलमडायला लागलेत. त्याचा थेट परीणाम नोकऱ्यांची कमी होणारी संख्या व त्यामधून वाढणारी बेरोजगारी व पुढे त्याच्या वैफल्यातून दिवसेंदिवस वाढणारी गुन्हेगारी या स्वरुपात दिसू लागला आहे. आपल्या देशातही या आर्थिक मंदीचे सावट आता गडद व्हायला लागले आहे. अश्यावेळी काही वेडेपणाचे निर्णय घेणे क्रमप्राप्त असते. हे निर्णय वेड्यासारखे, अतार्किक किंवा अव्यवहारिक जरी वाटले तरीदेखील आर्थिक मंदीने खीळ बसत चाललेल्या व्यापाराला गतीमान करण्यासाठी ते कामाचे असतात. आपल्या देशात असे निर्णय आपल्याला लवकरच करावे लागणार आहेत. अर्थात हे निर्णय सरकारच्या वतीने केले जातील असेही नाही. यातील काही निर्णय तर सामाजिक स्वरुपाचे राहणार आहेत ज्यामधे उत्सफुर्त लोकसहभाग अपेक्षित राहणार आहे. तसे बधितल्यास जगातील कोणत्याही भव्यदिव्य कामाकडे सुरुवातीला वेडेपणाचे लक्षण म्हणूनच बघितले गेले आहे. पुरातन काळातील तीच पद्धत आजही लागू पडते. अगदी आमटे दांपत्याने हेमलकसा येथे स

सैराट या चित्रपटावरील माझा समिक्षणात्मक लेख

Image
          सैराट- भानावर आणणारं येड सैराट या चित्रपटाचा शेवटचा 'तो' एक मिनीट बघितला आणि चित्रपटगृहातील बरेचजण सुन्न झाले. कोणतेही पार्श्वसंगीत नसणारा, कोणतेही संवाद नसणारा तो एक शांत मिनीट पुढील कित्येक तास अस्वस्थ करीत राहीला...त्या मिनीटापर्यंत पोहोचतानाचा चित्रपटाचा प्रवासही तेव्हडाच रंजक आहे. मध्यंतराच्यावेळी आर्ची आणि परश्या एकमेकांचा हात धरुन गावातून पळून जातात. त्यांचे तश्याप्रकारे पळून जाणे मध्यांतरातच अनेक प्रश्न निर्माण करते. आता पुढे यांचे काय होणार? या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी जेव्हा हा चित्रपट पुढे सरकतो तेव्हा नागराज मंजुळे या प्रतिभावान दिग्दर्शकाने राखलेली कलात्मक विलगता वाखाणण्यासारखी आहे. दिग्दर्शक विषयाची मांडणी करीत जातो व त्यानेच लिहीलेली कथा आपल्याला वास्तवाचे भान देत देत पुढे सरकत राहते. आपल्याही नकळत आपण स्वप्नांच्या दुनियेतून व्यावहारिकतेकडे जायला लागतो. विशेषतः या चित्रपटाच्या मूळ विषयाशी संबंधित असलेला तरुण वर्ग, ज्यांनी हा चित्रपट अक्षरशः डोक्यावर घेतलाय, त्यांना देखील 'प्रेमाच्या' भावनेबद्दल व त्या तरल भावना प्रत्यक्षात आणताना सामोरे जाव्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
वाटणी परंपरागत मिठाईचा व्यवसाय करणारे दोन गृहस्थ होते. दोघांचीही शहराच्या दोन बाजूला स्वतंत्र दुकाने होती. एकाच व्यवसायात असल्याने ते दोघेही एकमेकांना ओळखित होते. साधर्म्य हे की दोघांनाही तीन मुलेच होती. व्यवसाय बरा सुरु होता. हे दोघेही जेव्हा एकमेकांना भेटत असत तेव्हा आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत. घरचा व्यवसाय मुलांनी सांभाळावा ही त्यांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांनी आपापल्या मुलांना प्रशिक्षण देणे सुरु केले. अनेक बाबतीत साधर्म्य असले तरी प्रशिक्षणाच्या बाबत व त्या प्रशिक्षणातून दिल्या जाणाऱ्या विचारांमधे तफावत होती. यामुळेच या दोघांच्या जीवनाच्या गोष्टी विरुद्ध दिशेला गेल्या. केवळ वैचारिक तफावतीमुळे आयुष्याच्या संपुर्ण दिशा बदल वर्णन करणाऱ्या या दोन गोष्टी आहेत.  मुले मोठे झाल्यावर एका वडीलांनी मुलांना व्यवसायाबाबतच्या सर्व महत्वाच्या बाबी सांगणे सुरु केले. लहापणापासूनच आपल्याला व्यवसाय सांभाळायचा आहे अशी मनःस्थिती असल्याने तीनही मुलांची शिक्षणातील प्रगती जेमतेमच होती. परंतू व्यवसायात मात्र ती तरबेज झाली. मिठाईच्या दुकानातील तीन महत्वाचे विभाग जसे माल विकत आणणे, त्यानंतर
Image
My Article published in Hindusthan daily today under my column Thoda Hai, Thode ki Jarurat Hai वाटणी        परंपरागत मिठाईचा व्यवसाय करणारे दोन गृहस्थ होते . दोघांचीही शहराच्या दोन बाजूला स्वतंत्र दुकाने होती . एकाच व्यवसायात असल्याने ते दोघेही एकमेकांना ओळखित होते . साधर्म्य हे की दोघांनाही तीन मुलेच होती . व्यवसाय बरा सुरु होता . हे दोघेही जेव्हा एकमेकांना भेटत असत तेव्हा आपल्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत . घरचा व्यवसाय मुलांनी सांभाळावा ही त्यांची इच्छा होती . त्याप्रमाणे त्यांनी आपापल्या मुलांना प्रशिक्षण देणे सुरु केले . अनेक बाबतीत साधर्म्य असले तरी प्रशिक्षणाच्या बाबत व त्या प्रशिक्षणातून दिल्या जाणाऱ्या विचारांमधे तफावत होती . यामुळेच या दोघांच्या जीवनाच्या गोष्टी विरुद्ध दिशेला गेल्या . केवळ वैचारिक तफावतीमुळे आयुष्याच्या संपुर्ण दिशा बदल वर्णन करणाऱ्या या दोन गोष्टी आहेत .           मुले मोठे झाल्यावर एका वडीलांनी मुलांना व्यवसायाबाबतच्या सर्व महत्वाच्या बाबी सांगणे सुरु