थोडा है थोडे की जरुरत है @ 23.07.19
मूड चा सूड त्या दिवशी कार्यालयात फारच तणतण झाली . एकही काम नीट होत नव्हते . कार्यालयात पोहोचल्यावरच प्रचंड गरमी होत असताना केबीनमधला एसी काम करेना . केबीन साफ करणाऱ्या कर्मचाऱ्याने नीट साफसफाई केली नव्हती . त्यात कार्यालयातील दोन तीन कर्मचारी सुटीवर होते . एक न सांगता गेला होता . कामे तुंबलेली होती . काही कार्यालयांकडून तातडीने माहिती मागविण्यात आली होती . ती पाठविण्यासाठी लोक नव्हते . माहिती तयार झाली तर नेमका नेटवर्क चा प्राॅब्लेम उभा झाला . त्यामुळे अडथळे जास्त निर्माण झाले . तेवढ्यातच सहकारी प्राध्यापकाची तक्रार करीत एक दुसरे प्राध्यापक येऊन गेले . छोटेसे कारण परंतू त्यामधून उद्भवलेले भांडण विकोपाला गेले होते . असे काहीतरी सकाळपासूनच सुरु झाले . एकंदरीत तो दिवस कटकटीचाच होता . दुपारी देखील असेच काहीतरी घडत गेले आणि आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यात बरेच वेळा उजाडतो असा तो दिवस माझ्याही आयुष्यात उजाडला होता . दिवसभर वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण करुन करुन मी थकून गेलो . सा...