Posts

Showing posts from April, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @ 01.05.18

Image
ग्रे विचारांचे काही तार कसे जुळतात याचे काही आखीव गणित नाही . माणसाची विचार प्रक्रीया ही एक अतिशय गुढ व अतर्क्य व्यवस्था आहे . कोणत्या संदर्भाने कोणता विचार कोठे जोडल्या जाईल याचा काहीच अंदाज बांधता येत नाही . या विचार जुळणीला स्थळ काळाचेही बंधन नाही . असाच एक अनुभव मला नुकताच आला व खूप वर्षांपूर्वी ऐकलेल्या एका अफाट संकल्पनेशी मी जोडल्या गेलो . ती संकल्पना म्हणजे ग्रे .  बऱ्याच दिवसांनंतर घराला रंग देण्याचे ठरले . आता नव्या काळात रंग देणे ही एक नवी प्रक्रीया आहे . जुन्या काळी घराला रंग देताना घरातले बाबा सफेदी मारुन घ्यायचे आणि घर सजून जायचे . परंतू आता मात्र रंगाचे जगच बदलले . आपल्या घराला रंग द्यायचा म्हणल्यावर घरातील प्रत्येकाचे मत तयार होते . रंगाचे जग बदलले तसे घराघरातील वातावरण देखील बदलले . लोकशाही पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या खोल्यांचे रंग ठरविणे सुरु केले . यामधे घरापासून नोकरीच्या निमीत्ताने दूर असलेली देखील सर्व मंडळी ऑनलाईन सामील झाली व रंगाबाब