थोडा है थोडे की जरुरत है @13.11.18
पाडवा ... आठवांचा ! आज त्या चिमुरडीला काय झाले होते काही कळत नव्हते . नेहमी धमाल करणारी आणि सारा गोंधळ घालणारी ती पोर आज मात्र पाळण्यावर एकटीच बसली होती . एखादे खूप उड्या मारणारे आणि मजेदार आवाज करणारे एखादे खेळणे त्याच्यातील बॅटरी अभावी शांत होऊन जाते ना , अगदी तसे . एरवी तिच्या गोंधळ करण्याच्या कल्पकतेला सारेच त्रासलेले असतात . वेगवेगळ्या भन्नाट कल्पना तिच्या डोक्यातून निघतात . आणि मग त्या कल्पना पूर्ण करण्यासाठी ती चिमुरडी घरातील कोणती गोष्ट घेईल काही नेमच नाही . घरभर नुसता पसाराच पसारा . तिच्या त्या कल्पकतेचे कौतुक करताना कधी कधी तिची आई , तिची आजी चिडून जातात कारण या छोट्या बाईसाहेब पसारा करुन नव्या कल्पकतेने नविनच काहीतरी करण्यासाठी पसार झालेल्या असतात आणि त्यांच्या कल्पकतेच्या सादरीकरणानंतरची आवरासावर आईला किंवा आजीला करावी लागते . एकंदरीत तिच्या असण्याने घर दणाणून जाते . एकाच वेळी चित्रकार , नाटककार , दिग्दर्शक , कथाकार असे सारे मंडळी तिच्यात शिरलेले असतात व ...