Posts

Showing posts with the label पेन्सीलचा वापर

थोडा है थोडे की जरुरत है @ 17.01.23

Image
पेन्सीलचा वापर कधी कधी आपण ज्या गोष्टीचा वापर दुसऱ्याला करायला सांगतो त्याचा वापर आपल्यालाही करण्याची संधी मिळते . एकंदरीत एखादा चांगला विचार हा जेवढा ऐकणाऱ्यासाठी असतो तेवढाच तो सांगणाऱ्याकरीता देखील असतो असा अनुभव मला नुकताच आला .   दर रविवारी मी माझ्या होप कौन्सेलींग सेंटरच्या माध्यमातून बनविलेला एक व्हीडीयो समाजमाध्यमांवर शेअर करत असतो . मागील रविवारी मी एक छोटीशी पेन्सील कश्या पद्धतीने नाते संबंध टिकविण्याकरीता आपल्याला मार्गदर्शक ठरु शकते हे सांगितले होते . त्यामधे पेन्सील प्रमाणे मृदू , अहंभाव नसणारे व सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत सारख्याच पद्धतीने सोबत करणारे नाते शाश्वत असते असे मी सांगितले होते . यातला महत्वाचा भाग म्हणजे अहंभाव न ठेवता जसे पेन्सीलने काही लिहीलेले चुकले तरी ते पुसून पुन्हा लिहीता येते . नात्यांमधेही असेच असले तर मग त्यात सहजभाव राहतो . यात आणखी एक भाग येतो की पुसून पुन्हा लिहीण्यात पुढाकार कुणी घ्यायचा ? कारण शक्यतोवर परंपरागत पद्धत...