Posts

Showing posts from May, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.05.23

Image
मै नही … हम बोलीये !! मध्यंतरी खाकी नावाची एक वेबसीरीज बघण्यात आली . बिहारमधील गुन्हेगारी विश्व आणि त्याच्याशी लढणाऱ्या एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची फारच रंजक कथा यामधे दाखविण्यात आली आहे . सर्वात महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी विश्वावर आधारित असूनही यामधे फार अतिरंजीत घटना न दाखवता बऱ्यापैकी वास्तवावर आधारित सारे चित्रण केलेले आहे . खऱ्याखुऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका नक्षली कमांडरला पकडण्यासाठी केलेल्या संघर्षाचे वर्णन एका पुस्तकाद्वारे जगासमोर मांडलेले आहे . त्याच पुस्तकावर आधारित ही वेबसिरीज आहे . यामधे एका प्रसंगामधे एक साधा हवालदार आपीएस झालेल्या या मुख्य पोलीस अधिकाऱ्याला एक फार छान गोष्ट सांगतो . जी त्याच्या बिहारमधील वास्तव्याकरीता आणि त्याच्या कामाकरीता देखील महत्वाची असते . खरे तर आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यास असे सांगणे नियमात बसत नसते . परंतू वयाने मोठा असलेला तो हवालदार त्याच्या अनुभवाच्या बळावर हे सांगतो व त्याचा तो वरीष्ठ अधिकारी ते बरोबर पाळतो ज्यामुळे त्

थोडा है थोडे की जरुरत है @ 23.05.23

Image
किंमत पुण्याला एक दिवस मुक्काम झाल्यावर मुलीला फोन केला . ती देखील तेथेच राहत असल्याने भेट घ्यायची होती . भेटण्याचे ठिकाण वगैरे ठरल्यावर तिने मला सहजच विचारले , बाबा , तुमचा नास्ता झाला का ? मी तिला म्हणालो की नास्ताच करतो आहे . ती म्हणाली कुठे आहात तुम्ही ? मी तिला तिच्या महाविद्यालयाजवळच्याच एका हॉटेलचे नाव सांगितले . ते ऐकल्याबरोबर तिने जी प्रतिक्रिया दिली ती मला फारच छान वाटली . कारण ती प्रतिक्रीया माझ्या मुलीच्या व्यक्तिमत्वात झालेला बदल दर्शवित होती . खरे तर बाप म्हणून मला त्याबाबत विचार केल्यावर जरा वाईट वाटले . परंतू अंतीमतः आनंद याचा झाला की काही वर्षांपूर्वी आम्ही परीवारातील सर्वांनी मिळून तिच्या बाबतीत जो निर्णय घेतला तो निर्णय योग्य ठरला होता . तो निर्णय होता तिला बारावी झाल्यावर पुण्याला शिकायला पाठवणे . केवळ १७ वर्षांची पोर एकटी कशी राहू शकेल या प्रश्नाने आमच्या झोपा उडाल्या होत्या . परंतू निर्णय घेतला व तो निर्णय योग्य होता ही आश्वस्तता देणारी ती