थोडा है थोडे की जरुरत है @ 30.05.23

मै नहीहम बोलीये!!

मध्यंतरी खाकी नावाची एक वेबसीरीज बघण्यात आली. बिहारमधील गुन्हेगारी विश्व आणि त्याच्याशी लढणाऱ्या एका प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची फारच रंजक कथा यामधे दाखविण्यात आली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गुन्हेगारी विश्वावर आधारित असूनही यामधे फार अतिरंजीत घटना दाखवता बऱ्यापैकी वास्तवावर आधारित सारे चित्रण केलेले आहे. खऱ्याखुऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने एका नक्षली कमांडरला पकडण्यासाठी केलेल्या संघर्षाचे वर्णन एका पुस्तकाद्वारे जगासमोर मांडलेले आहे. त्याच पुस्तकावर आधारित ही वेबसिरीज आहे. यामधे एका प्रसंगामधे एक साधा हवालदार आपीएस झालेल्या या मुख्य पोलीस अधिकाऱ्याला एक फार छान गोष्ट सांगतो. जी त्याच्या बिहारमधील वास्तव्याकरीता आणि त्याच्या कामाकरीता देखील महत्वाची असते. खरे तर आपल्या वरीष्ठ अधिकाऱ्यास असे सांगणे नियमात बसत नसते. परंतू वयाने मोठा असलेला तो हवालदार त्याच्या अनुभवाच्या बळावर हे सांगतो त्याचा तो वरीष्ठ अधिकारी ते बरोबर पाळतो ज्यामुळे त्या नक्षली कमांडरला पकडण्याकरीता त्याला फार मोठी मदत मिळते. ती गोष्ट फार छोटी असते परंतू त्याचे परीणाम मात्र फार मोठे ठरतात.

दुसऱ्या प्रांतातून आलेला, नुकताच आयपीएस झालेला हा अधिकारी बिहारमधल्या एका अडचणीच्या जागी पोहोचतो. त्या ठिकाणी नक्षली चळवळ मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असते. या नक्षली चळवळीचा अत्यंत कडवा कमांडर तेथे उत्पात मचवित असतो. एका गावामधे घुसून त्याने तथाकथीत उच्चवर्णीयांच्या समारंभात बेछूट गोळीबार करून अनेक लोकांना ठार केले असते. वातावरण चिघळलेले असते. राजकीय दबाव असतो. अश्यावेळी त्या नक्षली कमांडरला पकडण्याकरीता ज्या पद्धतीचे नेटवर्क उभारल्या जायला हवे तसे मात्र उभारल्या जात नसते. हा नवा पोलीस अधिकारी फार प्रयत्न करतो. तेथल्या गावकऱ्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून त्यांच्याकडून त्या कमांडरच्या हालचालींची माहिती प्राप्त होऊ शकेल. परंतू त्याला अपयशच हाती येते. एकदा तो फार निराश होऊन आपल्या सहकाऱ्यांजवळ बोलून जातो की, मै इतना प्रयास कर रहा हूँ फिर भी ये बिहार के लोग मेरे साथ जुड़ते नही है, मै क्या करु, मेरे समझ मे नही रहा है. आपला अधिकारी असा निराश झालेला बघून त्याच्यापेक्षा बऱ्याच श्रेणीने कनिष्ठ असलेल्या त्या हवालदाराला रहावत नाही तो हिंमत करून आपल्या अधिकाऱ्याला सांगतोती गोष्ट…. जी फारच महत्वाची ठरते. तो सांगतो की, साहब, छोटा मूँह बडी बात, लेकीन आप ये जो अपने बोलने मे मै मै कहते रहते है ना यही समस्या है. इस मै को आप बदलकर हम कहीये और फिर देखीये ये बिहार आपके साथ कैसे खडा होता है.

अधिकाऱ्याच्या त्याची चूक लक्षात येते तो त्याच्या बोलण्यात वागण्याच्या पद्धतीमधे फरक करतो आणि खरोखरीच त्या हवालदाराने सांगितल्या प्रमाणे लोक त्याच्या सोबत उभे राहतात आणि या लोकांच्याच मदतीने तो एक दिवस त्या कमांडरला पकडण्यात यशस्वी ठरतो. मै पासून हम पर्यंतचा प्रवास हा असाच फलदायी असतो.

मी हे केले, मी ते केले असे सर्वच गोष्टींचे श्रेय स्वतःकडे ओढण्याची काही लोकांना सवय असते. प्रत्येक गोष्ट माझ्या भोवती कशी फिरत राहील याची योजना ही मंडळी कायम करीत राहतात. त्यासाठी वाटेल ते करून कोणत्याही कामाची दिशा ही स्वतःकडे कशी वळती करता येईल याचा प्रयत्न ते करीत राहतात. परंतू या असल्या मंडळींच्या प्रवासाच्या शेवटी हे एकटे पडलेले दिसतात. याउलट मी पेक्षा आपण ही भावना जर जोपासल्या गेली तर लोक जोडले जातात हे समजून घेणे गरजेचे असते. आपण ही एकत्रित असण्याची सहसंवेदनेची भावना आहे ज्यात अहंकाराला स्थान नाही. मी मधे अहंकार असतो जो एकटेपणाकडे न्यायला कारणीभूत ठरतो. जीवनात पदोपदी आपण या गोष्टीचा अनुभव घेत असतो. म्हणूनच त्या हवालदाराने सांगितलेली गोष्ट लोकसंग्रहाचा महत्वाचा मंत्र आहे. मै नहीहम बोलीये!!






Comments

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @ 21.03.23

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

थोडा है थोडे की जरुरत है @ 08.05.18