Posts

Showing posts from February, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 02.03.21

Image
ताटातूट एका मातेच्या उदरातून दोघांनीही जन्म घेतला . रुपाने तसे दोघेही जरासे वेगळे होते परंतू सोबतच जन्मलेले असल्याने सोबतच मोठे होत होते . आईच्या देखरेखीखाली त्यांचे खेळणे , बागडणे सारे काही विनायास सुरु होते . नाही म्हणायला दोघांपैकी एक जरा बदमाश होता . उगाच दुसऱ्याला त्रास द्यायचा . मग तो आईकडे जाऊन तक्रार करायचा व मग आई तिच्या पद्धतीने याला दम द्यायची . सर्वांनाच या दोघांच्या खेळण्याचे , बागण्याचे कौतुक वाटायचे . केवळ त्यांच्या आईलाच नाही परंतू आजुबाजूच्या मंडळींना देखील त्यांचा फारच लळा लागला होता . ती वाईट घटना होईपर्यंत सारे काही छान सुरु होते . बाजुच्या घरचे निवृत्त झालेले काका , समोरच्या घरची मिनी , पलिकडच्या घरच्या काकू असे वेगवेगळ्या वेळी या दोघांच्या खेळण्याचे व धमाल मस्ती करण्याचे कौतुक करुन जायचे . पण हे सारे , काही नतद्रष्ट लोकांना बघविले नाही . म्हणूनच त्यांनी असे काही केले की त्यामुळे ती आई आणि त्या दोघांचे विश्वच बदलले . अन्यथा परीसरात यांच्या खेळकर आ