Posts

Showing posts with the label आॅनलाईन ते आॅफलाईन

थोडा है थोडे की जरुरत है @ 13.08.19

Image
ऑफलाईन ते  ऑ नलाईन जवळपास दहा वर्षांपूर्वीचा एक दिवस : काका आणि काकू काही सामानाच्या खरेदीसाठी जायला निघाले . आजचा दिवस खरेदीसाठी ठरला होता . काकांची नोकरी फिरतीची असल्याने बऱ्याच दिवसांनंतर काकांनी वेळ काढला होता . त्यामुळे काकूंजवळ मोठी यादी होती . काही कपडे , काही भांडी , काकांकरीता त्यांना लागणाऱ्या काही वस्तू शिवाय काकूंना जरा एखादा दागिना देखील घेण्याची इच्छा होती . आज काका देखील चांगले मुड मधे होते . नुकताच बोनस मिळालेला असल्याने त्यांनी देखील तयारी दाखविली होती . एकंदरीत परांजपे काका काकू आज खरेदीचा आनंद घेणार होते .  सर्वात पहिल्यांदा त्यांनी कपडा खरेदी करण्याचे ठरविले . अनेक वर्षांपासून ज्या दुकानात ते जायचे त्याच दुकानात दोघे गेले . दुकानदारापासून ते तेथे काम करणाऱ्या माणसांपर्यंत सर्वांना ते ओळखत होते . त्यांची नावे देखील त्यांना ठाऊक होती . ते सर्वजण देखील या दोघांना बघून मनापासून आनंदले . मनसोक्त कपडा खरेदी केली . गप्पा झाल्या . काकूंनी मागल्यावेळी ...