Posts

Showing posts with the label उशीराचे सुख

थोडा है थोडे की जरुरत है @ 09.07.19

Image
उशीराचे सुख एका माणसाला एकदा लकी ड्राॅ मधे एक बक्षिस मिळाले . सहजच काही विशेष न करता त्याला ते मिळाल्याने फार आनंद झाला . ते बक्षिस म्हणजे त्याला त्याच्या परीवारासोबत एका अत्यंत देखण्या चित्रपटगृहामधे त्याला हवा तो चित्रपट बघण्याच्या पासेस . ज्या क्लासच्या पासेस त्याला मिळाल्या होत्या त्यामधे एका व्यक्तीचे तिकीट ४५० रुपये होते . त्यामुळे घरातल्या चार जणांकरीता या पासेस म्हणजे पर्वणीच होती . मध्यमवर्गीय परीवार असणारा तो माणूस ज्याला एरवी स्वत : चे पैसे खर्च करुन अश्या क्लासमधे चित्रपट बघणे जमले नसते . त्यामुळे त्याला व त्याच्या परीवाराला फार आनंद झाला . त्या पासेस वापरण्याची मर्यादा मात्र सहा महिन्याची होती . सहा महिन्याच्या काळात त्यांचा वापर करायचा होता . त्यामुळे स्वाभाविकपणे त्याने ठरविले की अनायसे पासेस मिळाल्या आहेत तर आपण एखादा चांगला चित्रपट बघितला पाहिजे . चांगल्या चित्रपटाची तो वाट बघू लागला . दोन तीन महिने निघून गेले परंतू त्याला हवा तसा चांगला चित्रपट ल...