Posts

Showing posts from January, 2016

My article published in Hindusthan daily today under थोडा है थोडे की जरूरत है

Image
प्रजासत्ताक दिन..एक नवा प्रवास आज आपण सर्वजण आपल्या लाडक्या देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रजेची सत्ता असलेला अर्थात जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला आपला देश, जगातील सर्वात जास्त विविधता असलेला आपला देश, जगातील कदाचित सर्वात जास्त संवेदनशील असलेला आपला देश आज दिल्लीच्या राजपथावर नजर ठेऊन आहे जेथे आपल्या देशाच्या सर्व शक्तीस्थळांचे दर्शन घडणार आहे. दिल्ली येथील राजपथावरील गणतंत्र दिवसाचे पथसंचलन बघताना आपल्या देशाबद्दलचा अभिमान दुणावतो. राजपथावर खाडखाड कवायत करीत जाणारी ती पथके, सैन्यदलातील आधुनिक शस्त्रास्त्रांचे भव्य दर्शन, वेगवेगळ्या राज्यांच्या कलासंस्कृतींचे दर्शन घडविणारे चित्ररथ, पुरुषांच्या बरोबरीने कवायत करणारे महिलांचे पथक, शौर्य गाजविलेल्या लहान मुलांचे पथक, महाविद्यालयांमधून प्रशिक्षण घेत असलेल्या राष्ट्रीय छात्रसेना व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांचे पथक इत्यादी सर्व बाबी बघताना आपल्या देशाच्या मजबूत, अभेद्य आणि एकसंघ प्रजासत्ताकाचा मनोमन अभिमान वाटायला लागतो. परंतू प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दाखविली जाणारी ही एकसंघतेची क्षमता केवळ २६ जानेवारी या दिवस

My article published in Hindusthan daily under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
हे का? नि.. हे कसे? हे का? नि... हे कसे? या प्रश्नार्थक शब्दांनी सुरु होणारे आपल्या देशाबद्दलचे अनेक प्रश्न मी गेल्या आठवड्यात ऐकले. त्यांची जमेल तेव्हडी उत्तरे मी दिली. काही वेळेला मला काहीच बोलता आले नाही म्हणून मी सफाईदारपणे विषयांतर केले. प्रश्न साधारणपणे असे होते.. या बैलांच्या शिंगांना रंग का लावतात? त्यांना त्या केमीकलचा त्रास नाही का होत? या गायी रस्त्यावर मोकळ्या का फिरत आहेत? मोटरसायकलवर चार लोक व समोर लहान मुलगा का बसला आहे? याने त्यांचा जीव धोक्यात नाही पडत का? पोलीस दिसत नाहीत, ते कुठे गेले? अपार्टमेंटच्या जाहिरातीवर बी एच के लिहीलेले आहे म्हणजे काय? तीळगुळ कसा बनवितात? गाड्या इतक्या जोरात हॉर्नस् का वाजवित आहेत? शाळेच्या एका वर्गात इतकी मोठी विद्यार्थी संख्या का आहे? हायवे वर गाडी रॉंग साईड ने कशी काय आली? सीट बेल्ट आवश्यक नाही का? कापूस कसा पिकवितात? येथे लोकांना इतकी कमी मजूरी का दिली जाते? शेतकरी का आत्महत्या करीत आहेत? तपोवन सारख्या संस्थांचे काम कसे चालते? त्यांना पैसा कसा प्राप्त होतो? महाविद्यालयाच्या मुली शारीरिकदृष्ट्या इतक्या कमजोर का वाटत आहेत? भारतात कोणत्या

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
तुफानाची तेजःपुंज शोकांतिका कुणी घर देतं का घर? एका तुफानाला कुणी घर देतं का घर? आयुष्याच्या चौरसावर सारं काही गमावून बसलेले असहाय नटसम्राट गणपतराव बेलवलकर विचारीत असतात हा प्रश्न आणि त्या प्रश्नाचा प्रत्येक शब्द व त्या प्रत्येक शब्दासोबत निर्माण होणारी वेदना आपले काळीज खोलवर जाळीत जाते. गणपतरावांची ही आर्त हाक आपल्या डोळ्याच्या कडा पाणावते व त्यासोबतच आपण सामील होतो एका शोकान्तिकेच्या प्रवासात. नटसम्राट - आणखी एक नाटक चित्रपट रुपाने आपल्यासमोर अवतरलंय. काही महिन्यांपूर्वी सुरांची कट्यार चित्रपटाच्या रुपाने सुबोध भावेंनी आपल्या ह्रदयात वसविली. आता महेश मांजरेकरांनी नटसम्राटची शोकान्तिका आपल्या अनुभवाला आणली, भव्य सेल्युलॉईडवर. नाटकाच्या रंगमंचाला असलेल्या मर्यादा येथे नाहीत, सेटची देखील ठराविक चौकट नाही. सोबत आपल्या दमदार अभिनयांनी व्यक्तिरेखा जिवंत करुन त्यात प्राण ओतणारे दिग्गज कलाकार यात आहेत. मुळात वि.वा. शिरवाडकरांच्या भाषेचा बाजही जवळपास तसाच जोपासला आहे त्यामुळे नटसम्राट हा चित्रपट बघणे म्हणजे अभिजात साहित्य, दर्जेदार अभिनय आणि अप्रतिम दिग्दर्शन याच्या त्रिवेणी संगमाचा लाभ घेण

My article published in hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
छुटे हुए लम्हे तो म्हणाला होता -  या एक जानेवारीला आपण नक्की भेटायचे. एक जानेवारी वर्षाचा पहिला दिवस. मराठी वर्षाचा नाही पण तरीही महत्वाचा दिवस कारण आपण इंग्रजी कॅलेंडरनुसारच आपले जीवन जगतो. मराठी कॅलेंडरचे सर्व महिनेही पाठ नसतात. पण एक जानेवारीला तो दिवस साजरा करण्याऐवजी काही मंडळी विनाकारणच आंग्ल आंग्ल म्हणून ओरडतात. जाऊ दे! आपल्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे. नव वर्षाची सुरुवात.. आज आपल्याला दोन मिनीटे का होईना भेटायचे आहेच. वर्षाच्या पहिल्या दिवसाची ही भेट मला वर्षभर आनंद देत राहणार आहे. त्या दोन मिनीटाच्या भेटीत काही बोलणे होणार नाही.. परंतू तुझ्या माझ्या प्रेमाला शब्दांची गरज कुठे आहे? आपण तर केवळ डोळ्यांनी बोलतो. डोळ्यांनी एकमेकांच्या मनाचा वेध घेता येतो इतकी एकरुपता आपल्या नात्यात आहे. मला तुला या एक तारखेला भेटून डोळ्यांनीच सांगायचे आहे की तू माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाची व्यक्ती आहेस आणि प्रेमाचा खरा अर्थ मला तुझ्या प्रेमाच्या उत्कटतेवरुनच कळला आहे. खरोखरीच असे तुटून प्रेम करता यावे आणि त्या प्रेमासाठी तुझ्यासारखी सखी मिळावी यापेक्षा भाग्य ते काय? पण हे सारे मला तुला जाणवू