Posts

Showing posts with the label अनोखा बाॅंड

थोडा है थोडे की जरुरत है @ 03.03.2020

Image
अनोखा  बाँड ती निघाली . उणीपुरी एकवीस वर्षांची ती पोर . तिची आई काळजीतच होती परंतू तिच्या बाबांनी मोकळेपणाने दिलेल्या परवानगीमुळे ती निघाली . पाठीवर एक छोटी सॅक लावून त्यात थोडेफार कपडे , काही पुस्तके व जुजबी सामान घेऊन तिच्या गावापासून जवळपास तेराशे किलोमीटर दूर असलेल्या एका गावी जाण्यासाठी ती निघाली , एकटी ! आईच्या मनामधे स्वाभाविकपणे धाकधूक होती . एवढा लांब प्रवास , त्यात काही प्रवास विमानाने , काही बसने तर काही खाजगी टॅक्सीने . राहणार कुठे , काही समस्या निर्माण झाली तर वगैरे सर्व बाबींनी आईचा चेहरा चिंताक्रांत होता . परंतू त्या चिमुरडीचे बाबा मात्र तयार होते . माझी पोरगी निश्चित जाऊ शकते आणि तिला करुन बघू दे , हेच अनुभव महत्वाचे असतात आयुष्यात आणि आजकाल मोबाईल फोन आहे त्यामुळे आपल्याला तिच्या संपर्कात राहता येईल असे तिचे बाबा तिच्या आईला समजावित होते . परंतू आईच्या डोक्यात मात्र नको नको ते विचार येत होते . केवळ एकविस वर्षांची पोर आणि एवढ्या लांब कशी जाईल ? ...