Posts

Showing posts with the label मी वाट बघतेय.. नव्या भगतची!!!

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.01.21

Image
मी वाट बघतेय .. नव्या भगतची मी वाट बघतेय भगतची . फार आतुरतेने . पण आजकाल माझे मित्र मैत्रीणी मला पार विसरून गेलेत असेच वाटते . त्याच्या इतर कामात ते एवढे गर्क आहेत की मला भेटायला येणे त्यांना जमतच नाही . खरे तर त्यांना अनेकवेळा माझे महत्व सांगितले जाते . त्यांचे आई वडील किंवा गुरुजन त्यांना माझ्या महत्वाबद्दल सांगत असतात . परंतू आता गंमत अशी झालीय की माझ्याबद्दल कुणी केवळ सांगायलाही लागले तरी माझ्या मित्र मैत्रीणींना बोअर होते . पण तरीही त्यांना माझ्याबद्दल कुणीतरी सांगतच राहते . याचे महत्वाचे कारण म्हणजे कुणी कितीही नाकराले तरी माझे महत्व कधीच कमी होत नाही किंबहुना ते कमी होऊच शकत नाही . कारण माझ्याकडे जी गोष्ट आहे ती कायमच सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेली आहे नव्हे , एखाद्या राष्ट्राचा खरा खुरा विकास घडवायचा असेल तर माझ्याजवळ असलेल्या या गोष्टीचा वापर केल्या जाणे क्रमप्राप्त आहे . ती गोष्ट म्हणजे मानव जातीला आवश्यक असलेले ज्ञान . परंतू त्या ज्ञानाकडे आजकाल फार मो...