Posts

Showing posts from 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.12.23

Image
फील इन द ब्लॅन्क्स नुकतीच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या माझ्या महाविद्यालयातील एक माजी सहकारी प्राध्यापिका यांच्याशी सहजच बोलण्याचा योग आला . त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला हजर राहण्याचा योगही आला होता . त्यानिमित्तच त्यांचा फोन होता . जुन्या व ज्येष्ठ सहकारी असल्याने , सोबतच मानाने व अनुभवाने देखील खूप मोठ्या असल्यामुळे त्यांच्याशी बोलणे मला फार आवडते . काही ना काही मिळत राहतं त्यांच्या बोलण्यातून . सर्वात महत्वाचे म्हणजे वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी जपलेली सकारात्मकता जी त्यांच्या वागण्यात व बोलण्यात मला भरभरून आढळते . त्या दिवशीही बोलता बोलता त्या असे काही बोलून गेल्या की मी त्वरित त्यांच्या बोलण्याला दाद दिली व त्यांना सांगितले की मॅडम , मला एक छान विषय मिळालाय , थोडा है .. च्या वाचकांसोबत शेयर करायला . त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाची चर्चा झाल्यानंतर मी त्यांना सहज विचारले , मॅडम , आणखी काय सुरु आहे तुमचे ? त्या पटकन म्हणाल्या , मी सध्या फील इन द ब्लॅ

थोडा है थोडे की जरुरत है @ 19.12.23

Image
वेदना ८१ वर्षांचे आजोबा माझ्याशी बोलत होते . मी त्या दिवशी सायंकाळी फिरायला निघालो होतो . त्यामुळे चालता चालता मी त्यांचे ऐकत होतो . माझ्या लिव्हींग वील बद्दलच्या लेखासंबंधी प्रतिक्रीया दिल्यानंतर ते मला म्हणाले की आपण मांडलेल्या संकल्पनेमुळे बऱ्यापैकी मदत होणार आहे परंतू त्याच्याही पुढे खरे तर जाण्याची गरज आहे . वैद्यकीय उपचारच नाही तर जीवनही नाकारण्याचा अधिकार असायला हवा . जीवनाची स्थिती कधी कधी अशी होऊन जाते की त्याचे ओझे होऊ लागते व त्यामुळे त्याचा देखील त्याग करण्याचा अधिकार मिळायला हवा . मी त्यांना समजावण्याच्या सुरात म्हणालो , काका असे का बोलताय ? असे जीवन संपविण्याचे बोलू नये . ते आपल्याला एकदाच मिळते . त्यामुळे अडचणी असल्या तरी सकारात्मकतेनेच जीवनाकडे बघावे . आपले खरे आहे की कधी कधी परीस्थिती फार वाईट होऊन जाते व अश्यावेळी असे नकारात्मक विचार मनात येणे अपरीहार्य असतात . परंतू असे नका बोलू . माझे बोलणे ऐकून ते मला म्हणाले , बेटा तू माझ्या मुलाच्याच वयाचा