Posts

Showing posts from April, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @ 30.04.19

भान नसलेल्यांचे भान सध्या आपल्या देशात सर्वदूर केवळ एकाच गोष्टीची चर्चा सुरु आहे , ती म्हणजे जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या या आपल्या देशात होत असलेल्या निवडणूका . मोठमोठ्या कार्पोरेट हाऊसेस पासून ते एखाद्या गावातील छोट्या चहा टपरीपर्यंत सर्वदूर या निवडणूकांबाबत चर्चा सुरु आहे . मतदान होण्याआधीच्या चर्चा आणि मतदान झाल्या नंतरच्या चर्चा . यामधे काही घनघोर चर्चा सोशल मिडीयावर देखील होत आहेत . परवा तर मतदान होण्याआधीच महाराष्ट्रात कोण कुठे निवडून येणार याबाबत एक संदेश वाचायला मिळाला . त्या संदेशामधील अतिआत्मविश्वास बघून तर मला निवडणूक आयोगाला विनंती करावीशी वाटली की त्यांच्या द्वारे मतमोजणीची जी भव्य प्रक्रीया श्रमपूर्वक राबविली जाणार आहे ती त्यांनी स्थगित करुन हा संदेश बनविणाऱ्याकडूनच निकाल जाहीर करुन घ्यावा . सर्वच स्तरावर निवडणूक व त्यामधील संभावित निकालाबाबत चर्चा सुरु आहे . यामधून कोणतेही क्षेत्र सुटलेले नाही . मिडीयाचा तर यासंदर्भात मोठा हातभार आहे . इलेक्ट्रॉन