Posts

Showing posts from April, 2022

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.04.22

Image
गुंत्याचे कारण व्याख्यान आटोपून निघण्याच्या वेळी त्या आजीने तिच्या आयुष्यात झालेल्या गुंतण्याच्या गुंत्याबद्दल मला सांगितले . आजीचे सारे ऐकून झाल्यावर मी तिला म्हणालो , आजी खरोखरीच हा गुंता सोडवायचाय की माझ्या व्याख्यानातील काही विचार तुमच्या आयुष्यातील घटनांमधे चपखल बसले म्हणून माझ्याशी बोलताय . कारण आजी मी कौन्सीलर आहे . कुणाचेही कौन्सेलींग करताना सर्वात महत्वाचा नियम आम्ही असा पाळतो की ज्याला समुपदेशन करून घ्यायचे आहे त्या व्यक्तीची संपुर्ण इच्छा हवी . सोबतच पूर्ण विश्वास ठेवून कौन्सीलर जे सांगतो आहे त्यानुसार काही काळ का होईना वागावे लागते . तरच त्या सांगण्याचा परीणाम होतो . तुमचे नेमकं काय आहे ते मला सुरुवातीला कळू देत . कारण मी जे बोलणार ते तटस्थपणे व तुमचा गुंता सोडविण्याच्या दृष्टीने सांगणार . मी तुम्हाला आवडेल असे बोलेलच असे नाही तर माझे काही बोल तुम्हाला बोचू देखील शकतात . म्हणून तुमची तुम्हाला छान वाटेल ते ऐकायचे आहे की खरोखरीच गुंता सोडविण्याकरीता सल्