Posts

Showing posts from January, 2022

थोडा है थोडे की जरुरत है @ 01.02.22

Image
काचेवरचं दव पहाटेच्या थंडीत सायकल चालवित जाताना मला तो पहिल्यांदा दिसला तेव्हा मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते . परंतू दुसऱ्याही दिवशी त्याची तीच कृती मला जरा विचारात टाकून गेली . म्हणून मी थांबलो . थंडी बरीच होती व आजकाल घरात पार्कींग नसल्याने कार्स रस्त्यावरच पार्क केलेल्या असतात . थंडीमुळे त्या कार्सच्या काचांवर दवं पडलं होतं . आधल्या दिवशीही मला जाणवले होते की तो मुलगा त्या कार्सच्या काचांवर काहीतरी लिहीतोय . पण एक सहजच घडणारी गोष्ट म्हणून मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते . परंतू दुसऱ्याही दिवशी तो मला तेच करताना दिसला तेव्हा मात्र मी जरा थांबलो . रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या प्रत्येक कारच्या काचांवर तो काहीतरी लिहीत होता व पुढे जात होता . मी थांबून बारकाईने बघितले व त्याने लिहीलेले वाक्य वाचल्यावर मात्र मला त्याला भेटण्याची इच्छा झाली . तो पुढे पुढे जात होता व मी त्याच्या नकळत माझी सायकल हातात धरून त्याच्या मागे जाऊ लागलो . माझ्या लक्षात आले की त