थोडा है थोडे की जरुरत है @ 10.04.18
शेवटचा आधारवड कोसळताना आमच्या पिढीला खरा खुरा आधार देणारा , व कुटुंबातील सर्वांना एकमेकांशी बांधून ठेवणारा आमच्या कुटुंबातील शेवटचा आधारवड कोसळतोय .. जुन्या काळात ज्याला खऱ्या अर्थाने कुटुंब संबोधीले जायचे तश्या पद्धतीचे माझ्या आईचे कुटुंब . तीन भाऊ , त्यांची एकुण चौदा मुले , त्यांची मुले असे मिळून जवळपास साठ सत्तर जणांचे मोठे कुटुंब . यामधील तीन आजोबा व तीन आज्या या खऱ्या अर्थाने या कुटुंबाचे आधारवड होते . तीन वेगवेगळ्या घरांमधे जरी रहात असले तरी त्यांच्या सर्व मुलांमधे व नातवांमधेही एक प्रकारची छान एकरुपता होती . चुलत , मामे असा काही भेदच नव्हता कारण या सहा मोठ्या आधारवडांनी हा संपुर्ण परीवार मजबुतीने धरुन ठेवला होता . या सर्व पसाऱ्यामधे मतभेद नव्हते असे नाही , भांडणे नव्हती असेही नाही परंतू असे सर्व असले तरीही प्रसंगी सारेच एकत्र येऊन मनातील वाद संपवून छान एकत्रपणे नांदत होते कारण या सर्वांना तसे करायला भाग पाडत होते हे सहा आधारवड . नाती गोती जपण्याचे , त्या...