Posts

Showing posts from September, 2023

थोडा है थोडे की जरुरत है @ 03.02.23

Image
स्पर्श .. ( २ ) सर , मी जे आता तुम्हाला सांगणार आहे ते फारच वाईट आणि त्रासदायक आहे . माझा काहीच इलाज नाही . म्हणूनच माझ्या मुलीला येथून घेऊन जाणे हाच एक पर्याय माझ्याकडे आहे . सर , माझ्या मुलीला माझ्याच सख्ख्या भावाकडून , तिच्या मामाकडून धोका आहे . ही गोष्ट माझी मुलगी येथे आल्यापासूनच सुरु झाली . माझा भाऊ गेल्या काही महिन्यापासून माझ्या मुलीला चुकीचा स्पर्श करतो आहे . सुरुवातीला माझ्या मुलीच्या लक्षात आले नाही . पण नंतर मात्र तिच्या लक्षात आले की हे काहीतरी वेगळे आहे . कॉलेजमधून परतल्यावर त्याची बायको घरी नसते . खरे तर हा पण नोकरी करतो पण दुपारी मुद्दाम घरी जेवायला येणे त्याने सुरु केले . माझ्या मुलीला त्याच्या बायकोने सूचना दिल्या होत्या की दुपारी मामा घरी आल्यावर अन्न गरम करून घ्यायचे व नंतर त्याला वाढायचे व स्वतः देखील जेवायचे . ही अन्न गरम करत असताना हिच्या खांद्यावर हात ठेवून तो हिची चौकशी करायचा . जवळ येऊन उभा रहायचा . सुरुवातीला हिला फार काही वाटले नाही

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23

Image
स्पर्श .. ( १ ) वाचक मंडळी , मी आज एका अतिशय संवेदनशील विषयावर लिहीत आहे . सदर विषय दोन भागांमधे लिहीला आहे . असल्या विषयांसंदर्भात अजूनही आपल्या समाजात बोलले जात नाही ही मोठी खंत आहे . आपण सर्वांनी याबाबत विचार करावा व जमेल त्या पद्धतीने ही समस्या कमी होईल याबाबत प्रयत्न करावा ही विनंती . सदर विषयावर मी काहीतरी लिहावे असे माझी मैत्रीण प्राची पालकर हिने मला सुचविले . त्याक्षणी मला महाविद्यालयात घडलेली एक घटना आठवली . वर्णन केलेली घटना मागच्या वर्षीची आहे . खरे तर मला देखील हा विषय मांडायला उशीरच झाला आहे , त्याबद्दल क्षमस्व . सर , माझ्या मुलीचे नाव तुमच्या कॉलेजमधून नाव काढायचे आहे . आता मला माझ्या मुलीला शिकवायचे नाही . माझ्यासमोर माझ्या केबीनमधे एका मान खाली घालून बसलेल्या मुलीची तिच्या सोबत आलेली आई मला हे सांगत होती . एखादी विद्यार्थिनी असे महाविद्यालयातून नाव काढत असेल तर स्वाभाविकपणे मी स्वतः पूर्ण चौकशी करूनच तशी परवानगी देत असतो . मी त्यांना काय अडचण