Posts

Showing posts from November, 2015

Article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सामर्थ्य या संवादास दे... दोन पिढ्यांमधील संवाद हे कधी सुसंवाद तर कधी विसंवाद असतात. हा नियम कोणत्याही ठराविक पिढ्यांच्या जोडीला लागू पडतो असे नाही. प्रत्येकच दोन पिढ्यांमधे हा प्रकार आढळतो. फरक पडतो तो केवळ विषयांचा, गरजांचा आणि बदललेल्या समाजव्यवस्थेचा. बाकी विचारांचे वेगळेपण हे स्वाभाविकपणे राहतेच. असाच एका बाप व लेकी मधला पत्ररुपी संवाद मला वाचायला मिळाला. हे दोन्हीही संवाद एकमेकांना दिलेली उत्तरे नाहीत तर स्वतंत्र मते आहेत. मी या पत्रांचा वाचक म्हणून या दोन्हीही मतांच्या मधे उभा राहून माझे मत तपासून घेतोय. लेकीचा पत्ररुपी संवाद: बाबा, तुम्ही मला जरा समजून घ्यावे असे मला वाटते. मी आत मोठी झालेय हे प्रथम तुम्ही तुमच्या मनाला पटवायला हवे. मी आता अकराव्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. बाबा मला सोळावं वर्ष लागलंय. आता मला काही निर्णय माझ्या मनाने घेऊ द्या ना. मला ठाऊक आहे की तुम्हाला माझी फार काळजी वाटते आणि मला हे देखील ठाऊक आहे की ही काळजी तुमच्या माझ्यावरील प्रेमामुळेच निर्माण होत असते. पण बाबा, मला आता तुमचे काळजी करणे बंधन वाटायला लागले आहे. मला तुम्ही मोबाईल फोन देणार नाही असे सा

Article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है about कट्यार काळजात घुसली

Image
सूर निरागस हो... सुबोध भावेचा नितांत सुंदर चित्रपट -कट्यार काळजात घुसली - बघण्याचा नुकताच योग आला. अभिजात शास्त्रीय संगीताच्या भक्कम पायावर उभा असलेला हा चित्रपट प्रत्येकाला भरभरुन आनंद देतो. सुरांची ताकद काय असते, संगीतकला ही किती श्रेष्ठ दर्जाची कला आहे आणि सुरांचे पावित्र्य टिकविण्यासाठी माणसाला मनाचे पावित्र्य जपावे लागते हे या चित्रपटातून ठळकपणे मांडले आहे. परंतू अभिजात शास्त्रीय संगीताची ताकद हा चित्रपट बघण्यासाठी आलेल्या प्रत्येकाला जाणविते. हे अभिजात शास्त्रीय संगीत कळत असो अथवा नसो, त्याचा परीणाम प्रत्येकाच्या मनावर झालेला जाणवितो. त्यामुळेच एरवी शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपटांमधे काही लोक आरडाओरड करतात किंवा विचित्र कॉमेंट्स करतात. परंतू येथे असे काही होत नाही. संपुर्ण चित्रपट वेगवेगळ्या चिजांनी, बंदीशींनी, आलापांनी, नाट्यपदांनी नटलेला आहे परंतू त्याचे सादरीकरण व सुरांची ताकद इतकी जबरदस्त आहे की प्रत्येकजण भारावून चित्रपट बघत राहतो आणि त्या सुरांच्या वर्षावामधे चिंब भिजून निघतो. चित्रपटातील पंडीतजींच्या निरागस सुरांनी जणू मूळ सा पासून सुरु झालेला हा चित्रपट त्यांच्या शि

दै. हिंदुस्थानच्या दिवाळी अंकात प्रकाशित माझा लेख "मामाचं हरवलेलं पत्र"

Image
मामाचं हरविलेलं पत्र साधारण तीस वर्षांपूर्वीचे एक चित्र: उन्हाळा जवळ यायला लागला की सर्वप्रथम जाणीव व्हायची ती म्हणजे परीक्षेची. परीक्षा आली की प्रत्येकाला तिचा ताण यायचाच. परंतू तो ताण घालविण्यासाठी आई-बाबांकडे एक छान गम्मत होती. ती गम्मत म्हणजे एक सुंदर स्वप्न. मुलगा किंवा मुलगी अभ्यासाचा कंटाळा करायला लागली की आई म्हणायची, "बाळ आता छान अभ्यास करुन घे, मग परीक्षा आटोपल्यावर तुला मामाच्या गावाला जायचंय ना? मामाचं पत्र आलंय आणि त्याने आपल्याला बोलावलंय" हे वाक्य म्हणजे जणूकाही शब्दरुपी अमृत वर्षाच असायची. परीक्षेच्या धाकाने सश्यागत झालेलं मन त्या स्वप्नातील पूर्ण होणाऱ्या अनेक गोष्टींच्या केवळ आभासांनी पक्षागत उडायला लागायचं. परीक्षेचा तो अभ्यासाचा कालावधी त्या स्वप्नपूर्तीच्या विचारांनीच संपून जायचा आणि लगेच सारे भाऊ बहिण थेट पोहोचायचे आपल्या आजोळी. हे सारे तेथे पोहोचल्यानंतर तर काय गम्मत. एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास केवळ धमाल. कमी अधिक वयाची किमान दहा पोरे असायची. भल्या पहाटे उठणे, गावामधे त्या काळी नदी असायची आणि विशेष म्हणजे उन्हाळ्यातही ती वाहती असायची. नदीवर पोहाय

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळीची सुटी...कुणाची? "चला, आता शाळेला सुट्टी लागणार. जरा निवांत मिळेल. सारखे रोज तेच तेच. सकाळी उठा , धावपळ करा. शाळेची तयारी... ती देखील साधीसुधी नाही. केव्हडाली ती स्कूल बॅग...धावत धावत निघा, केव्हडे ते होमवर्क. शाळेचे वेगळे, ट्युशनचे वेगळे. सोबतच वेगवेगळे प्रोजेक्ट करा. हे सारे प्रोजेक्ट शाळेच्या वेळात होतच नाहीत. किती मेहनत करावी लागते. त्यात दर महिन्याला परीक्षा असतेच. चांगला नंबर यायलाच हवा. आता दोन दिवसानी दहा दिवस मस्त आराम मिळू शकेल. शाळेला सुटी लागली की छान वाटते. मोकळा वेळ मिळतो. जरा वाचन वगैरे करता येईल..." ही सारी वाक्ये शाळेच्या व पर्यायाने अभ्यासाच्या अती व्यस्त कार्यक्रमाला कंटाळून सुटीचा आनंद घेऊ इच्छीणाऱ्या शाळकरी मुलांचीच राहू शकतात असा आपला समज राहू शकतो. परंतू ही सारी वाक्ये मी शाळकरी मुलांच्या तोंडून नव्हे तर त्यांच्या शाळेच्या आणि अभ्यासाशी पूर्णपणे बांधल्या गेलेल्या मुलांच्या आयांकडून ऐकली आहेत.. रोज सकाळी प्रभातफेरी आटोपून मी घरी येत असतो आणि त्याचवेळी लहान शाळकरी मुले शाळेत जात असतात. नेहमी दिसणारे एक चित्र मला विचारात टाकते. साधारण चौथ्या वर्