थोडा है थोडे की जरुरत है @ 10.06.18
वीस वर्षांपूर्वीची रात्र !! परवा मित्राचा फोन आला . आठवतंय का ? बरोबर वीस वर्षांपूर्वी आपण दोघे सोबत कुठे होतो ? ८ जून १९९८ . आठवतंय का काही ? जरासा ताण दिला आणि अचानक सारे काही समोर चित्रपटागत सरकून गेले . आपले आयुष्य जगत असताना आपण प्रत्येकच क्षण आनंदामधे परावर्तीत करत जगले पाहीजे असे तत्वशः मान्य असले तरी देखील कधी कधी रोजच्या त्याच पद्धतीच्या जीवनाचा कंटाळा येतो व त्यामुळे त्या नेहेमीच्या ठराविक साच्यापासून जरा दूर आणि निवांत जाण्याच्या संधी आपण कायम शोधत असतो . यामधील काही संधी इतक्या अप्रतीम असतात की त्यांच्या स्मृती मनःपटलावर कोरल्या जातात . त्या स्मृतींना जेव्हा जेव्हा स्मरतो तेव्हा तेव्हा पुनःप्रत्ययाचा आनंद प्राप्त झाल्याशिवाय रहात नाही . अश्याच एका कायम लक्षात राहीलेल्या रात्रीची आठवण माझ्या मित्राने मला करुन दिली . ८ जून १९९८ रोजी मी आणि माझा जिवलग मित्र विजय , आम्ही दोघे होतो किल्ले रायगडावर ! प्रत्येक मराठी मनाला जेथे गेल्यानंतर अभिमान वाटावा व ...