थोडा है थोडे की जरुरत है @ 07.12.21
संवेदना अजूनही आहे साधारण सहा महिन्यापूर्वीची घटना आहे . मी विद्यापीठात कार्यरत असतानाचा प्रसंग . त्या दिवशी फार काही भेटणारे नव्हते व मी माझे काम करत माझ्या केबीन मधे बसलो होतो जेव्हा ते दोघे मला भेटायला आले . विद्यार्थी भेटायला आले की मला फार आनंद होतो कारण ते नेहेमीच माझ्यासाठी सर्वात महत्वाचा घटक राहीले आहेत . त्यांना वेळ व प्राथमिकता द्यायलाच हवी ही मान्यता अगदी सुरुवातीपासून माझी असल्याने मी माझे काम बाजूला ठेवले व त्यांच्याशी बोलू लागलो . विद्यार्थी संघटनेचे ते दोघे पदाधिकारी होते . एका अतिशय महत्वाच्या विषयावर ते माझ्याशी बोलायला आले होते . सर्वच अधिकाऱ्यांना दोघादोघांनी भेटायचे असे त्यांनी ठरविले होते . त्यानंतर पुढचा अर्धा तास ते मला तो विषय समजावून सांगत होते . त्यांचे मी काळजीपूर्वक ऐकत तर होतो परंतू त्याच वेळी माझे मन भूतकाळात रमू लागले . त्यांना बघून कालचक्र उलट दिशेने फिरावे तसे काहीसे मला झाले . माझ्याच आयुष्यातील काही प्रसंगांना त्यांच्याकरवी मी...