Posts

Showing posts with the label डॉल्फिन बनुया

थोडा है थोडे की जरूरत है!!

Image
डॉल्फीन बनुया !! त्या दिवशी राकेश असा कसा वागला ? काय झाले त्याला ? कसला ताण आहे का त्याच्या मनावर ? त्या ताणापोटी त्याने चक्क आपल्या हाताची नस कापून घ्यावी ? आपल्या संस्कारामधे काय कमतरता राहीली म्हणून राकेश असा वागतोय ? या आणि असल्या अनेक वाक्यांचा संवाद राकेशच्या आई वडीलांमधे त्या रात्री सुरु होता . चांगल्या व संस्कारीत घरातला आपला मुलगा असे चुकीचे वागू शकतो यावर राकेशच्या आई वडीलांचा विश्वासच बसत नव्हता . या संवादानंतर मग आपण आपल्या मुलासाठी किती करतो , आपल्या मुलासाठी दोघेही नोकरी करुन किती कष्ट करतो , त्यामुळेच त्याला सगळ्या सुखसोयी आपण दिलेल्या आहे , परंतू या सर्व त्यागाचे राकेशला काहीच वाटत नाही , तो संवेदनाहीन झालाय वगैरे पद्धतीचे दोषारोपण व स्वतःच्या त्यागाचा पाढा वाचून झाला . त्यानंतर आपल्या संस्कारांच्या कमकुवतपणाबद्दल अश्रु ढाळणाऱ्या राकेशच्या आईला त्याच्या बाबांनी शांत केले व नेहमीप्रमाणे काही काळजी करु नको , मी सर्व सांभाळून घेतो , पोरगा जास्त लाडावला ...