थोडा है थोडे की जरुरत है @ 25.07.23
मुव्ह ऑन तू मुव्ह ऑन करायला हवे . तो एकमेव पर्याय आहे या सर्व गोष्टींवर . हे बघ , मला मान्य आहे की त्या व्यक्तीचे तुझ्या आयुष्यात फारच महत्वाचे स्थान आहे . त्याच्या सहवासामधे घालविलेले सारे क्षण हे तुझ्या आतापर्यंतच्या आयुष्यामधील सर्वोत्तम क्षण होते . ज्या पद्धतीचे नाते तुम्ही दोघांनीही अनुभवले ते खरोखरीच छान होते . परंतू काही कारणांमुळे आता त्या नात्यामधे तुला अपेक्षित असे प्रेम उरलेले नाही . तुला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही . याची तुला जी कारणे वाटतात ती तू मला सांगितलीस व ती सारी मला पटलेली आहेत . अर्थात या नात्याची दुसरी बाजू त्या दुसऱ्या व्यक्तीकडून मी अद्याप ऐकलेली नाही . परंतू तू माझा पेशंट असल्याने मी तुझीच बाजू समजून तुला काही गोष्टी सांगतोय ज्या तू ऐक व त्यानंतर निर्णय घे . मी फक्त मार्ग दाखविणार . निर्णय तुलाच करायचा आहे . नाते विस्कळित झाल्याने मनाने कोलमडून गेलेला एक तरुण माझ्यासमोर बसला होता . मनापासून त्याने ते नाते जपण्याचा प्रयत्न केला होता ...