Posts

Showing posts from October, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @30.10.18

Image
आज सरे मम एकाकीपण ! आईच्या गर्भामधे एका छोट्याश्या बीजाच्या रुपात आपले अस्तित्व निर्माण होते . माता पित्याचा अंश बनून आपण एका अद्भुत विश्वाच्या दिशेने हळूवारपणे प्रवास करु लागतो . एक अफाट व अनाकलनीय विश्व ज्याच्या उत्पतीचे अनेक वैज्ञानिक तर्क आहेत परंतू त्याच्या शाश्वत अस्तित्वाबद्दल ज्ञान अद्याप अप्राप्त आहे . या विश्वामधे आणखी एक अद्भुत गोष्ट आहे जी येथील सर्वच बाबींची दोन मुख्य गटांमधे विभागणी करते . सजीव आणि निर्जीव . सजीवाचे वेगळेपण सिद्ध करणारी चेतना ज्यास आत्मा असे नाव देण्यात आले ती देखील एक गुढ कल्पना आहे . एका प्रचंड मोठ्या उर्जा स्रोताचा एक लहानसा भाग एका जीवात प्रवेशित होऊन एक काया धारण करतो व ती काया काही विशिष्ट कालावधीनंतर त्या उर्जेला पुन्हा कदाचित तिच्या मूळ स्रोताकडे जाण्यास वाट मोकळी करुन देते व या प्रवेश अर्थात जन्म आणि गमन अर्थात मृत्यू या दोन विलक्षण टोकांमधे प्रत्येकाला मिळलेले जीवन ही या सबंध विश्वातील एक अभूतपूर्व घटना असते . जन