Posts

Showing posts from July, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @31.07.18

Image
दीवार अमिताभ बच्चनच्या यशस्वी कारकिर्दीत अमुल्य योगदान दिलेल्या महत्वाच्या चित्रपटांपैकी एक होता दीवार . व्यावहारीकता आणि आदर्शवाद याचा संघर्ष या चित्रपटाला फार उंची प्रदान करुन गेला होता . नकारात्मक किनार असलेली भुमिका अमिताभच्या वाट्याला आलेली होती तरी त्याने जगातील अन्यायाच्या विरोधात विद्रोह करणारा विजय फारच अप्रतिम वठविला होता . चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे फार कौतुक झाले . या चित्रपटातील संवाद देखील फार गाजले कारण ते सर्व थेट मनाला भिडणारे होते . मै आज भी फेके हुये पैसे नही उठाता म्हणणारा अमिताभ म्हणजे अँग्री यंग मॅन म्हणून खऱ्या अर्थाने स्थापित झाला . पैसा मिळवायला हवा कारण पैश्यानेच जगाला काबीज करता येते , पैश्यामुळेच जगाला आपल्या टाचेखाली ठेवता येते व पैसा नसेल तर लोक वाटेल त्या प्रकारे अवहेलना करतात या जाणिवा धगधगत मोठा झालेला विजय , जो पैसा कमावण्यासाठी काहीही करायला तयार होतो . परंतू त्याचे साध्य मात्र आपल्या आईला सुखी करण्याचे असते . ज्या इमारती