Posts

Showing posts from March, 2022

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.03.22

Image
झेन चे हास्य पैसा आणि आनंद हे नेहेमीच सोबत असतात असे नाही . पैश्यामुळे अनेक आनंदी क्षण प्राप्त होऊ शकतात हे जरी खरे असले तरी आनंद मिळविणे ही मात्र एक प्रवृत्ती असते . प्रचंड पैसा असेल तरच आनंद मिळतो असे अजिबात नाही . छोट्या छोट्या गोष्टीत देखील ज्यांना आनंद मिळविता येतो तो सुखी माणूस . परंतू कधी कधी तर पैसा आहे किंवा नाही याच्याही पलीकडे जाऊन अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येते . अश्यावेळी खरे तर त्या दुर्दैवी व्यक्तीला दुःखी होण्याचा अधिकार असतो कारण परमेश्वरानेच त्याच्यावर अन्याय केलेला असतो . अश्या व्यक्तीने जगावर चिडून नकारात्मक विचार केला तरी ते समजण्यासारखे असते . पण बरेच वेळा शरीराने धडधाकट असलेले व सारे काही छान असलेले लोकही आपल्याला अतिशय नकारात्मक विचार करताना दिसतात . सारखी कश्यावरतरी टीका करत राहणे हा त्यांचा छंद असतो . या असल्या स्वभावामुळे लोकांना त्यांच्या आसपास राहणे आवडत नाही . याच्या अगदी उलट झेनचे होते .  जन्मतः शारीरिक किंवा मानसिक दृ