Posts

Showing posts with the label स्पर्श

थोडा है थोडे की जरुरत है @ 06.04.21

Image
स्पर्श परदेशातल्या आपल्या काकाची ती आतुरतेने वाट बघत होती . मनाने काकाशी फार जोडलेली होती ती . काकाबद्दल कुणी काहीही बोलू लागले तर त्याची बाजू घेऊन भांडण्यात तिचा पहिला नंबर असायचा . दहा महिन्याच्या कालावधीनंतर तिचा काका परत आपल्या घरी येणार होता . ज्या दिवशी तो आपल्या मुख्य घरी पोहोचणार होता त्या दिवशी तर ती फारच बेचैन होती . तिने ठरविले होते की काकाला सांगायचे की तू आता परत जाऊ नकोस . तू तिकडे असलास की तुझी आम्हा सर्वांना फार आठवण येते . तू तिकडे असलास की काकू आणि मुले देखील कोमेजून जातात . मला देखील तुझी खूप आठवण येते . तू असतोस तेव्हा मस्त सगळ्यांना हसवतोस , गमती जमती करतोस आणि सगळे घर कसे हसते राहते . आपल्या काकाला ती हे सारे काही सांगणार होती , तो आल्याक्षणी . तो भारतात पोहोचला आणि मग कारने निघाल्याचा त्याचा मेसेज आला . साधारण तीन तास लागणार होते त्याला नागपूरहून पोहोचायला . त्या तीन तासात तिने किमान तीस वेळा तरी दरवाज्याजवळ जाऊन बघितले . तिला काकाश...