Posts

Showing posts from December, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
मिसालें बनाई जाती है।... मिसालें बनाई जाती है बेटाजी, वो भुलाई नही जाती... एक महान कुस्तीपटू बापाच्या रुपात आपल्या मुलीला तिच्या जीवनातील सर्वात महत्वाचा संदेश देत असतो. पण तो संदेश आपल्या मुलीला देण्यासाठी त्याने व तो संदेश समजून घेण्यासाठी त्याच्या मुलीने जी जीवापाड मेहनत केलेली असते ती प्रत्यक्ष बघणे व त्याचा अनुभव करणे ही आपल्यासाठी व आपल्या घरातील मुलांबाळांसाठी एक सुवर्णसंधी ठरते.. ही सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त होते ती हिंदी चित्रपट सृष्टीतील एक समर्पित अभिनेता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमीर खानच्या नव्या व नितांत सुंदर अश्या दंगल या चित्रपटाच्या माध्यमातून. प्रख्यात कुस्तीपटू महावीरसिंह फोगट व त्यांच्या कुस्तीपटू मुलींच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट आपल्याला एक संपुर्णपणे वेगळा व मनाला भावणारा अनुभव देऊन जातो तो देखील अत्यंत संयतपणे व कुठेही लाऊड न होता. बरेच वेळा सामाजिक संदेश देणारे चित्रपट जरा अतिरंजीत वर्णने करुन संदेश समाजमनावर बिंबविण्याचा प्रयत्न करीत असतात किंबहुना झोपलेल्या समाजमनाला खडबडून जागे करण्यासाठी कधीकधी ती आवश्यकता देखील असते. परंतू आमीरखानचा दंगल चित्रपट मात्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
छोटीशी...पण फार मोठी गोष्ट!! या महिन्यात मला लौकीकार्थाने सामान्य परंतू कृतीने असामान्य असलेल्या तीन व्यक्तींना भेटण्याची व काही क्षणच संपर्कात येण्याची संधी मिळाली. या तीनही व्यक्तींचे कार्य बघता ते साधेपणात मोडणारेच होते. परंतू या व्यक्ती ती कामे करीत असताना ज्या गोष्टी प्रसरीत करीत होत्या त्या मात्र फार मोलाच्या होत्या. त्या गोष्टीहून महत्वाचे म्हणजे या गोष्टी सांगत असताना किंवा या गोष्टींचा प्रचार करताना त्यांनी त्याबाबत कुठलाही अभिनीवेश बाळगला नव्हता. अगदी सहजच त्या महत्वाच्या बाबी या व्यक्ती करीत होत्या. या व्यक्ती होत्या बोरे विकणारी काकू, चॉकलेट विकणारा दुकानदार व एका खानावळीचा मालक. सकारात्मकतेने आपल्या छोट्याश्या कार्यातून देशहिताचा प्रामाणिक प्रयत्न करणारे असे लोक बघितले की आपल्याला आपल्यातही सकारात्मक उर्जा जाणवू लागते. एकाच महिन्यात अश्या तीन व्यक्ती मला सापडल्या. पहिली होती बोरे विकणारी काकू. माहूर गडावरुन खाली उतरताना आबालवृद्धांना वेड लावणारी ती गोष्ट मला दिसली. उकडलेली बोरे. मस्त उकडलेली आणि मीठ लावलेली बोरे म्हणजे आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला आवडणारी गोष्ट असते.

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरुरत है

Image
सकारात्मकता गमावणारी बुद्धीमत्ता आधुनिक काळात आपण सर्वजण आपल्या जीवनाची उलथापालथ करुन टाकणाऱ्या संक्रमणावस्थेतून प्रवास करीत आहोत. ही संक्रमणावस्था नव्या भौतिक जगताची तर आहेच परंतू त्यासोबतच नवी वैचारिक आंदोलने निर्माण करणारी देखील आहेत. हे नवे बदल आपल्यापैकी प्रत्येक विचारी मनाला विचार करायला बाध्य करतात. प्रसंगी या नवविचारांना व त्यामधून सामोरे येणाऱ्या बदलांना स्विकारताना आपली ओढताण देखील होत असते. एकंदरीत कमी अधिक प्रमाणात आपण सर्वच एका विशिष्ठ प्रकारची संभ्रमावस्था अनुभवतो आहे. परंतू माणूस हे परमेश्वराने निर्मिलेले एक असे अद्भूत रसायन आहे की कोणत्याही परीस्थितीमधे जगण्याचे वेगवेगळे मार्ग त्याला सापडतात व त्याद्वारे तो आनंद निर्मीती करु शकतो. अर्थात मानवाकडे असणारी ही सकारात्मकतेची क्षमता सर्वांनाच वापरता येते असे नाही. काही वेळा जीवनात अनुभवावी लागणारी संभ्रमावस्था नकारात्मक भुमिका निर्माण करताना आढळते. मानवाकडे असलेल्या अपरीमित बुद्धीमत्तेचा वापर काही मंडळी विविध बाबींमधील सकारात्मकता गमावण्यासाठी करताना दिसतात तेव्हा मात्र आश्चर्य वाटू लागते. एखाद्या विषयातील बुद्धीमत्ता चांगल

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
लव्ह यू डियर जिंदगी आपल्याला वेगवेगळे आजार होतात तेव्हा आपण कसलाही संकोच न करता लोकांना त्याबद्दल माहिती देतो. ह्रदयाची समस्या आहे, किडनी खराब झाली आहे किंवा तत्सम आजार सांगितले जातात. तंत्रज्ञानाच्या जगात तर दवाखान्यात भरती होण्यापासून तर सुटी मिळण्यापर्यंतचे फोटो काढून सोशल मिडीयावर अपलोड केले जातात. परंतू विचारांच्या बाबतीत जर काही समस्या असेल व त्यासाठी एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे जायचे असेल तर मात्र समस्या निर्माण होते. त्याबद्दल अजिबात बोलायचे नाही असे ठरलेले असते. ज्याला तशी समस्या असेल तो किंवा त्याचे नातेवाईक फारच वेगळ्या पद्धतीने त्या समस्येकडे बघतात. कुणाला सांगायचे नाही, संशयात्मक वागायचे, खोटे नाटे सांगायचे व असे करुन त्याचा किंवा तिचा तो मनाचा आजार लपवायचा जेणेकरुन त्याला कुणीही वेडे ठरविणार नाही. एखाद्याला किती सहजच आपण वेडे ठरवितो, नाही? मनाचा आजार हा प्रत्येक वेळी थेट वेडेपणाच्या वर्गवारीत येत नसतो तर बहुतांश वेळी वागण्याचे संदर्भ जरा विस्कळीत झाल्याने किंवा ते न कळल्याने निर्माण झालेली ती संभ्रमावस्था असते जी फार कमी वेळात व योग्य मार्गदर्शनाने दूर केल्या जाऊ शकते...