Posts

Showing posts with the label मेंटल फ्लश

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.04.21

Image
मेन्टल फ्लश रात्री साडे अकराच्या सुमारास मित्राचा अचानक फोन आला . मला म्हणाला , माझ्या घश्यात कफ आल्यासारखा वाटतोय . साधारण ९ वाजल्यापासून मला तसे वाटतेय . मी सुरुवातीला वाट बघितली परंतू आता मात्र कफ कमी होत नाहीये . घरातले सर्वजण जागे आहोत . काय करावे सुचत नाहीये . आजच आजुबाजूची बिघडलेली स्थिती वर्तमानपत्रात वाचली . टीव्ही वर देखील सारखे दाखवत आहेत . आपल्याही गावात स्थिती काही चांगली नाही . दवाखान्यांमधे जागा नाही . माझे कसे होणार ? आजच व्हॉट्स ॲपवर देखील वाचले . एका व्हिडीयोमधे सध्या रुग्णांची अवस्था काय भयंकर झालीय ते बघितले . स्मशानभुमीचीही अवस्था .. बापरे .. मला बोलवत नाहीये रे ... बायकोचे तर सारखे रडणे सुरु झालेय . मुले देखील घाबरुन गेलीत . आई बाबा आहेत घरी . त्यांना मी खोलीत बंद ठेवले आहे . अगदीच राहवले नाही म्हणून मग तुला फोन केला . आता काय करायचे ते सांग . आता कुणाला फोन करायचा ? यावेळी कोणत्या डॉक्टरकडे जाता येईल ते सांग . मी जाऊन येतो . तुला येता येणार नाही . मी ...