Posts

Showing posts from 2020

थोडा है थोडे की जरुरत है @ 29.12.20

Image
अर्बन अँक्स - ३  ( गोल्डन अवर ) त्या दिवशी अनू कित्येक वर्षात पहिल्यांदा कुणाचीही परवानगी न घेता आणि कुणाचाही विचार न करता आपल्या जीवनातील एक तास केवळ स्वतःसाठी वेगळा काढून बसली होती . आशुने हे तिला जाणवून दिले . आशू बोलू लागला . त्या दिवशी त्याचा स्वर आणखी छान आणि आश्वासक वाटत होता . अनू , आज मी तुला जे सांगणार आहे ना ते तुझ्या मनात यापूर्वी आले नसेल असे नाही परंतू याबाबत तू गांभिर्याने विचार केलेला नाहीस हे मला जाणवते . म्हणूनच या अर्बन अँक्सच्या सापळ्यात तू अडकली आहेस . आता आपल्याला यातून बाहेर निघायचेय आणि त्याकरीता आपल्याला मदत करणार आहे गोल्डन अवर . एक सोनेरी तास जो तुझ्या दिवसभरातील चोवीस तासांमधूनच तुला वेगळा काढायचा आहे . तुझी सारी कर्तव्ये , तुझे सारे काम , तुझे तुझ्या परीवाराप्रतीचे समर्पण , त्यांच्यासाठी तू करीत असलेल्या सर्व गोष्टी , परीवारातील प्रत्येकाच्या इच्छांनुसार तू स्वतःमधे केलेला बदल , इतरांच्या इच्छांपूढे विसरुन गेलेल्या तुझ्या इच्छा , आपल्या