थोडा है थोडे की जरुरत है @ 08.12.20

वो तो है अलबेला

काय? याला क्रिकेट आवडत नाही? हा क्रिकेट खेळत नाही? हे दोन प्रश्न माझ्या सोबतच्या त्या काकांनी माझ्या मित्राला एवढ्या जोरात विचारले की मी देखील दचकलो. एका मित्राकडे सहज गप्पा मारण्याकरीता बसलो असताना तो जेव्हा त्याच्या दहावीतल्या मुलाची ओळख करुन देत होता तेव्हा माझ्यासोबत त्याच्या घरी गेलेल्या काकांनी एकदम अशी प्रतिक्रीया दिली. त्या दहावीतल्या मुलाने स्वतःची ओळख दिल्यावर काकांनी त्याला त्याच्या खेळातील आवडी निवडी संदर्भात विचारले आणि त्याने मला क्रिकेट अजिबात आवडत नाही आणि म्हणून मी खेळत देखील नाही असे सांगितले. त्यानंतर काकांनी दिलेली प्रतिक्रीया म्हणजे तो मुलगा फार मोठा गुन्हा करतोय की काय अश्या पद्धतीने उद्गार काढले. तो बिचारा कावरा बावरा होऊन घरात निघून गेला. काकांच्या चौकश्या पुढे सुरु राहील्या. काका अचानक स्वयंघोषित समुपदेशकाच्या भुमिकेत शिरले गंभीर चेहेरा करुन त्यांनी माझ्या मित्राकडे त्याच्या मुलाच्या इतर आवडी निवडी बाबत चौकशी सुरु केली. माझ्या मित्राने देखील सारे सांगितले. माझ्या मित्राच्या बोलण्यासोबत काका आणखी जास्त गंभीर होत गेले. मला देखील गंमत वाटू लागली. माझ्या मित्राचे त्याच्या मुलाबाबत सारे ऐकून काका काय अन्वयार्थ काढतात याची मला उत्सुकता लागली होती. माझ्या मित्र सांगत होता, की त्याच्या मुलाला क्रिकेट अजिबात आवडत नाही. तो जरासा वेगळाच आहे. तो दहावीत असून त्याला गाडी चालवून बघण्याची इच्छा होत नाही. त्याला पेंटींग खूप आवडते. परंतू त्याला कपडे वगैरे खरेदी करण्याची उत्सुकता नाही. तो कधीही नवनवीन गोष्टी विकत घेऊन मागत नाही. त्याचा बुट जुना झाला तरीदेखील तो नवा मागत नाही. मलाच त्याला सांगावे लागते की आपण तुझ्यासाठी नवा बुट घेऊ तर तो म्हणतो की अजून काही दिवस चालू शकतो. त्याला मित्रांसोबत भांडणे जमत नाही. तो शिव्या देऊ शकत नाही. मित्र वगैरे आहेत परंतू त्याला स्वतःची कंपनी सगळ्यात जास्त आवडते. इंग्रजी गाणी खूप ऐकतो. त्याला स्वयंपाकघरात वेगवेळे पदार्थ करायला आवडतात. तो त्याच्या आईसोबत रेसीपीज बद्दल बोलत असतो. अश्या बऱ्याचश्या गोष्टी माझ्या मित्राने त्याच्या मुलाबद्दल सांगितल्या. त्या प्रत्येक गोष्टीसोबत काकांचा चेहेरा गंभीर होत गेला. माझा मित्र त्याच्या मुलाबद्दल हे सारे वर्णन ज्या गांभिर्याने करीत होता त्यावरुन माझ्या मित्राच्याही मनात काहीतरी सुरु आहे हे मला जाणविले. परंतू लक्षात येत नव्हते. हे सारे सांगून झाल्यावर काका याबद्दल काय प्रतिक्रीया देतात याची उस्तुकतेने माझा मित्र वाट बघत असताना मी सहजच बोलून गेलो, अरे वा, छान आहे तुझा मुलगा! माझे हे वाक्य ऐकल्याबरोबर माझ्या मित्र आता पूर्णपणे समुपदेशकाच्या भूमिकेत शिरलेले काका या दोघांनीही माझ्याकडे एक तीव्र कटाक्ष टाकला जणू काही मी काहीतरी फारच पचणारे बोललो आहे. माझ्याकडे दुर्लक्ष करुन काकांनी माझ्या मित्राला समजाविणे सुरु केले. मला फारच उत्सुकता होती की माझ्या मित्राच्या मुलाच्या ज्या गोष्टी मला कौतुकास्पद वाटल्या होत्या त्याबद्दल काका काय सांगतील? मी काळजीपूर्वक ऐकू लागलो

त्यानंतर साधारण अर्धा तास त्या काकांनी माझ्या मित्राला जे सांगितले जे त्याला मनापासून पटले त्याबद्दल मी कपाळावर हात मारुन घेतला. परंपरागत विचारांच्या चौकटी आपल्या मनामधे एवढ्या घट्ट झाल्या आहेत की त्या आता बंद पिंजरे बनल्या आहेत आणि या वर्षानूवर्षे आपल्या मनावर आरुढ झालेल्या संकल्पना अजिबात बदलता जेव्हा अजूनही आपण लोकांचे मुल्यमापन करतो तेव्हा आपण मोठा अन्याय करतो ही माझ्या मनातील भावना आणखीच घट्ट झाली.

काका सांगत होते, तुला तुझ्या मुलाला एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे दाखवायला हवे. त्याचे हे वागणे खूपच वेगळे आणि त्याच्या मुलगा असण्याच्या प्रवृत्तीच्या विरोधातील आहे. मुलांना क्रिकेट आवडायला हवे, त्यांनी वेगवेगळ्या वस्तू मागायला हव्यात, त्याने त्याच्या सोबतच्या इतर मुलांप्रमाणे बोलायला हवे, त्याचे हे असे वस्तू आवडणे, स्वतःमधेच राहणे, स्वयंपाकघरातील गोष्टी आवडणे, व्यायाम करुन कसदार शरीर बनविण्याची इच्छा निर्माण होणे, गाडी चालवावी वाटणे, वेगाचे आकर्षण नसणे हे सारे काही त्याच्या नैसर्गिक पुरुष प्रवृत्तीच्या विरोधात आहे. यावर लवकरच उपाय केला नाही तर त्याच्या भविष्यातील जीवनामधे समस्या निर्माण होऊ शकतात. हे सारे माझ्या मित्र तन्मयतेने काकांशी सहमत होऊन ऐकत होता मला लक्षात आले की त्वरित आपल्या मुलाला एखाद्या मानसोपचार तज्ञाकडे नेण्याची खुणगाठ त्याने बांधली आहे. मला अचानक काही वेळापूर्वी स्वतःची छान ओळख करुन नंतर कावरा बावरा होऊन निघून गेलेल्या त्या दहावीतल्या मुलाची दया आली. हा सर्व सल्ला देऊन काका त्यांच्या पुढील कामासाठी निघून गेले माझ्या मित्राने माझे आभार मानले की मी त्या काकांना त्याच्याकडे घेऊन गेलो ज्यामुळे अनेक दिवसाचे त्याच्या मनावरचे ओझे कमी झालेय. त्याच्या या वाक्यावर मी रागावून एकच बोललो, मानसोपचार तज्ञाकडे तुझ्या मुलाला नव्हे तर तुला जाण्याची गरज आहे. त्यानंतर पुढील एक तासभर मी माझ्या मित्राला अक्षरशः झापून काढले

काय वेडेपणा होता तो. मुलाच्या आणि मुलीच्या वागण्यासंबंधीचे हे ठोकताळे आपल्या मनात किती जास्त घर करुन आहेत? आधुनिक काळाचे आपण पांथिक बनलोत परंतू अजूनही आधीच्या काळातील निरुपयोगी विचारांची ओझी मात्र खांद्यावर घेऊन चालतोय. एका घरी एक मुलगा आपल्या आईला मदत व्हावी म्हणून रोज सकाळी अंगण झाडतो, पाणी शिंपडतो त्याच वेळी त्याची मोठी बहिण त्याच अंगणात बसून आपला सिव्हील सर्विसेसच्या परीक्षेचा अभ्यास करते. हे असले चित्र अजूनही सहन होत नाही. मुलगा असली कामे करतो म्हणून त्याच्या पुरुष असण्याबद्दल आणि मुलगी त्याचवेळी अभ्यास करते म्हणून तिच्या स्त्रीपणाबद्दल हे नैसर्गिक नाही असा विचार केला जातो. कारण ज्या भुमिका वर्षानुवर्षे आपल्या मनावर कोरल्या गेल्यात त्यामुळे झाकोळून गेलेले आपले मन अजूनही बदल स्विकारायला तयारच नाही. क्रिकेट आवडते की नाही हे एखाद्या मुलाच्या पौरुष तपासण्याची चाचणी असू शकते का? त्याला शिव्या देता येत नाहीत, तो वस्तुंसाठी मागे लागत नाही किंवा तो गाडी चालविण्याचा हट्ट करीत नाही यावरुन त्याच्या व्यक्तिमत्वामधे काहीतरी समस्या आहे हा तर्क काढणे किती चुकीचे आहे. माझ्या मित्राला हे सारे सांगताना मी शेवटी जे सांगितले ते ऐकून त्याने माझा हात घट्ट धरला भरल्या आवाजाने तो मला म्हणाला, खरंय यार, माझा बच्चू तर स्पेशल आहे, त्याला मी उगाचाच ऑड समजत होतो.

प्रत्येकाला जन्मतः एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असते. सर्वात मोठी चूक जर आपण कोणती करत असतो, ती म्हणजे एकाच्या व्यक्तिमत्वाच्या साच्यामधे जबरदस्तीने दुसऱ्याला बसविणे. स्त्री पुरुषांच्या वागण्याचे काही ठोकताळे आहेत जे सामाजिक दृष्टीकोनातून पाळायला हवेत परंतू त्यापेक्षा काही प्रमाणातही वेगळी वागणूक असेल तर थेट त्याच्या किंवा तिच्या सामान्य असण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे वाईटच नाही तर अन्यायकारक आहे. प्रत्येकाला आपल्या विचारांच्या चौकटीमधे जबरदस्तीने बसविण्यापेक्षा त्याच्या वेगळ्या चौकटीचे वेगळेपण स्विकारणे जास्त आनंददायी राहू शकते. हे करीत असताना ती चौकट हानीकारक किंवा इतरांना त्रास देणारी नाही ना एवढीच काय खात्री बाळगणे आवश्यक आहे. परंतू क्रिकेट आवडत नाही म्हणून किंवा स्वयंपाकाची आवड नाही म्हणून मुलामुलींच्या नैसर्गिकतेवर शंका उपस्थित करणे हेच मुळात आधुनिक काळात अनैसर्गिक कृत्य आहे. मित्राला मी एवढेच सांगितले, वो तो है अलबेला, हजारो मे अकेला, सदा तुमने ऐब देखा, हुनर तो देखा!!






Comments

  1. सुंदर
    वैचारिक मांडणी

    ReplyDelete
  2. पाल्यांच्या संबंधित पालकांची कालसुसंगत भूमिका आपण खुपच छान मांडली.
    छान प्रबोधन झाले.
    अभिनंदनासह धन्यवाद.

    ReplyDelete
  3. अप्रतिम, सर्व पालकांसोबतच सर्व शिक्षकांना देखील बहुमोल मार्गदर्शन.

    ReplyDelete
  4. फारच वास्तवाभिमुख आणि पेरणादायी आहे.....
    👌🙏👌🙏

    ReplyDelete

  5. फारच वास्तवाभिमुख आणि पेरणादायी आहे.....
    👌🙏👌🙏

    -प्राचार्य डॉ.गजानन जाधव,देऊळगावराजा

    ReplyDelete
  6. Superb blog..its reality..nice writing..Very realistic and sowing..👌👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
    Replies
    1. समर्पक लेख सर!या लेखातील "प्रत्येकाला एक व्यक्तिमत्त्व असते" हे वाक्य खूप आवडलं!💐💐

      Delete
    2. कुछ तो लोग कहेंगे आणि मराठीत लोक काय म्हणतील, या शब्दांमुळे आज आपले मुलं मागे राहतात. अस म्हणणाऱ्या साठी उत्तम लिहिलेलं आहे. खूप उत्स्फूर्त दाई लेख.🙏🙏🙏

      Delete
    3. अगदी खरंय.लोकं एकाच चौकटीत राहून विचार करतात. प्रत्येक मूल आणि त्याच्या क्षमता या वेगळ्या असतात. आई-वडिलांनी त्या समजून घेण आवश्यक आहे. आपल्या मुलाचं मूल्यमापन शिक्षक वगळता इतर लोकांच्या हाती देऊ नये.
      अप्रतिम लेख आहे.

      Delete
  7. खूप छान लिहीलंस. अशा वेगळ्या, विशेष मुलांना समाज सहज समजूनच घेत नाही. काकांसारख्या लोकांनी केलेल्या कमेंट्समुळे त्यांचे पालक धास्तावून जातात. आपल्या मुलात काही कमतरता आहे असंच त्यांना वाटते. अशा सर्वांच्या डोळ्यात तू अंजन घातलंस..

    ReplyDelete
  8. सुंदर अन अतिआवश्यक लिखान... आजच्या घडीला सर्व सोयी उपलब्ध असल्यामुळे पालकांच्या पाल्याबद्दल अपेक्षा वाढलेल्या आहेत अन त्या अपेक्षा मुलांवर लादल्याने वेगवेगळ्या समस्या दिवसेदिवस वाढत आहेत म्हणूनच पालकांना मुलांच्या भावनांसंमधी अवगत करणे आवश्यक आहे...शुभेच्छा

    ReplyDelete
  9. Thanks to all for acknowledging my thoughts as they need to be spread through social conscience...

    ReplyDelete
  10. अलबेला....'तारे जमी पर' ची आठवण झाली. मुलांच्या कलाकलाने जावं लागतं हे महत्वाचं.
    अप्रतिम मांडणी.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. Very sensible psychoanalysis of the blooming minds with a literary touch. Congratulations.

    ReplyDelete
  13. Very good analysis, sometimes the personality needs to be understood with a different angle and not just with traditional one, congratulations for a judicious and balanced thinking

    ReplyDelete
  14. खूपच छान लेख! बदलत्या काळानुसार प्रत्येकानी स्वत:मध्ये वैचारिक परिवर्तन करणे आवश्यक आहे..

    ReplyDelete
  15. खूपच छान लेख! बदलत्या काळानुसार प्रत्येकानी स्वत:मध्ये वैचारिक परिवर्तन करणे आवश्यक आहे..

    ReplyDelete
  16. वा सर खुप समर्पक.

    ReplyDelete
  17. "साध्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे" लेख तर नेहमीप्रमाणेच सहजसुंदर आहेच,मुख्य=मोबा.च्या चौकटीत बरोबर मावेलसा असूनही जाड टाईपामुळे वाचणं सोपं झाल्याने पूर्ण आस्वाद घेता येतोय.हार्दिक अभिनंदन

    ReplyDelete
  18. Excellent Sir. Sensitive expression.



    ReplyDelete
  19. Khup sunder vaicharic mandni sir,thank u sir, Rohini Deshmukh

    ReplyDelete
  20. Sunder Avinash..such type of writing n orientation is necessary for today's parents

    ReplyDelete
  21. विद्यमान प्रश्नाची कालसुसंगत उकल खुप छान केली.

    ReplyDelete
  22. प्रा. संजय पाटील, वाशीम

    ReplyDelete
  23. Very realistic and inspiring 👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

थोडा है थोडे की जरुरत है @30.01.24

दै. हिंदुस्थान दिवाळी अंक लेख

थोडा है थोडे की जरुरत है @ 26.09.23