Posts

Showing posts from October, 2015

My article published in Hindusthan Daily under थोडा है थोडे की जरूरत है

Image
वैचारिक आंदोलने.. सध्या आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरु आहेत. अचानक आपला समाज जागरुक झाला की ही मुळातच असलेली जागरुकता माध्यमांच्या मदतीने प्रत्येकापर्यंत पोहोचायला लागली आहे हा देखील एका वेगळ्या चर्चेचाच विषय असू शकतो. परंतू ही एक चांगली नांदी आहे. जुन्या आणि नव्या विचारांच्या चर्चांमधूनच आपण भविष्यात एका चांगल्या आणि पोषक समाज व्यवस्थेकडे अग्रेसर होऊ. सध्याची मात्र एक फारच वेगळ्या प्रकारची संक्रमणावस्था प्रत्येकजण अनुभवतो आहे. प्रभावी दृक श्राव्य माध्यमांच्या सहाय्याने एखाद्या विषयावरील दोन्ही बाजुचे विचार ऐकायला किंवा वाचायला मिळतात. सध्या हे विचार प्रगटीकरण आपल्याला थोडेसे भडक, अतिरंजीत किंवा आत्मकेंद्री वाटत असले तरी हळूहळू या सर्व विचारमंथनाला एक दर्जा प्राप्त होईल व त्यानंतर विविध चर्चांमधून खरा समाजोपयोगी आधार निर्माण होऊ शकेल. अनेकांना सध्या या सर्व चर्चा वायफळ व वेळ वाया घालविणाऱ्या वाटत असतीलही परंतू त्यांच्याकडे सकारात्मकतेने बघितल्यास आपल्याला जाणवेल की या चर्चा विविध विषयांमधील लोकांचा सहभाग वाढवित आहेत. या सहभागाची व्याप्ती हळूहळू वाढून देशाच्या विविध योजनांमधेही

My article published in Hindusthan Daily under my column थोडा है थोडे की जरूरत है today

Image
विधात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण मुंबई शहरात २००६ साली झालेल्या बॉम्बस्फोटामधील काही गुन्हेगारांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली व काहींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्या दिवशी सर्व वृत्तवाहिन्या ब्रेकींग न्युज म्हणून ही बातमी दाखवित होत्या. शिर्षक सर्वांचे सारखेच होते, मुंबई लोकल बॉम्बस्फोटांच्या पिडीतांना अखेर न्याय मिळाला. साधारण नऊ वर्षांनंतर हा निर्णय करण्यात आला. अर्थात या निर्णयाला पुन्हा वरील कोर्टात आव्हान दिले जाणार आहेच. त्यामुळे शिक्षेवर अंतीम शिक्कामोर्तब केव्हा होईल हे नक्की सांगता येत नाही परंतू सध्या शिक्षा सुनावण्यात आली ही समाधानाची बाब आहे. या सर्व प्रकारात एक बाब आणखी घडली. ती म्हणजे, यापैकी काही गुन्हेगारांना अमरावतीच्या कारागृहात बंदीस्त ठेवण्यासाठी आणण्यात आले. अमरावतीला त्यांना त्यांनी केलेल्या निर्घण कृत्यासाठी बंदीस्त ठेवले जाणार आहे व या कृतीमुळे विध्यात्याच्या न्यायाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. या अमरावतीशी ज्यांचा घनिष्ट संबंध होता, अनेक वर्षे ते अमरावतीकरच होते असे एक गृहस्थ या बॉम्बस्फोटामधे दुर्दैवाने मृत्यूमुखी पडले होते. त्यांच्या मृत्यूला कार

My article published in Hindusthan Daily under the column थोडा है थोडे की जरूरत है

Image
उदो बोला उदो!! कालपासून अमरावती शहरात अंबामातेचा-एकविरामातेचा -उदो बोला उदो- हा जयघोष सुरु झालाय. शहराच्या या ग्रामदेवतांचा जंगी उत्सव सुरु आहे. आता पुढील आठ-रात्री या शक्तीच्या प्रतीक असलेल्या मातांची मनोभावे पुजा केली जाणार, उपवास केले जाणार, पहाटे उठून अनवाणी मंदीरामधे जाऊन दर्शने घेतली जाणार, आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी नवस बोलले जाणार, मातांची पुजा केल्यानंतर हाताला दोरे बांधले जाणार वगैरे वगैरे. एकंदरीत या शक्तीरुपी मातांवरील श्रद्धा जमेल तेव्हड्या तीव्रतेने व्यक्त करण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न होणार. अमरावतीच्या या श्रद्धास्थानांना मनोभावे भेटी देणाऱ्या भक्तांचे निरीक्षण केल्यास आपल्याला एक गोष्ट ठळकपणे जाणविते, ती म्हणजे या ग्रामदेवतांचेच मानवी रुप घेऊन या पृथ्वीतलावर वावरत असलेल्या माता-भगिनींची संख्या या भक्तगणांच्या गर्दीत जास्त असते. विशेषतः शाळा, महाविद्यालयांमधे शिकत असलेल्या मुलींची तर संख्या फारच जास्त आढळते. एरवी पहाटे उठायला कंटाळा करणारी विद्यार्थिनी या नऊ दिवसांमधे पहाटे चार वाजता उठून, शुचिर्भुत होऊन, अनवाणी दोन किलोमीटर अंतर चालून मंदिरांमधे दर्शनाला येत

My article published in Hindusthan Daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सांगीतिक आनंद प्रवास मागील आठवड्यात पांढरकवडा या गावी १२३ वर्षे जुन्या गणेशोत्सवामधे व्याख्यानासाठी जाण्याचा योग आला. नेहमीप्रमाणे यवतमाळला मित्र मंडळींच्या भेटी घेऊन एका मित्रा समवेत पांढरकवड्याला जाण्यासाठी गाडीने निघालो. निघण्यापूर्वीच मित्राने सूचना केली की यवतमाळ ते पांढरकवडा हा रस्ता खूप खराब झाला आहे, मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे काळजीपूर्वक गाडी चालव. माझ्या ड्रायव्हींगवर माझा विश्वास असला तरीही मी जरा सावध झालो होतो. यवतमाळ गावातून निघतानाच एका ठिकाणी रस्त्याच्या मधोमध कुणीतरी गाडी पार्क केल्यामुळे निर्माण झालेल्या रहदारीच्या खोळंब्यामुळे प्रवासाची सुरुवात ताणयुक्तच झाली. पण ताण कमी करण्याच्या दृष्टीने गाडी रस्त्याच्या मधोमध पार्क करण्यामागे त्या गाडीवाल्याचे देखील काहीतरी लॉजीक असेल आणि ते लॉजीक समजावून घेण्यासाठी आपण आपले रक्त का जाळून घ्यावे असा विचार आम्ही दोघांनीही केला. पण प्रवासाची ही तर सुरुवात होती. अश्या प्रकारे ताण घेत प्रवास करण्यापेक्षा काहीतरी उपाय करावा हा विचार आम्हा दोघांच्याही मनात येतो न येतो तोच, माझ्या गाडीत नेहमी उपलब्ध असलेल्या सुंदर गाण्यांच्या