Posts

Showing posts from March, 2018

थोडा है थोडे की जरुरत है @27.03.18

Image
वक्त की शाँख के लम्हें माझ्या व अनेकांच्या अतिशय आवडीचे कवी द ग्रेट गुलजार यांच्या काव्यप्रतिभेतून बरेच वेळा उमटत असलेली एक संकल्पना वक्त की शाँख के लम्हे मला अनेक वेळा मोहवते . किती सुंदर कल्पना सुचतात कवीला ! आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा विचार करता आपण मार्गक्रमण करीत असलेल्या जीवनप्रवासाबद्दल ही संकल्पना किती चपखल बसते . जमिनीत रुजलेल्या आणि वेगवेगळ्या प्रकारे वृद्धिंगत होत जाणाऱ्या झाडाप्रमाणेच आपले जीवन असते व त्या जीवनरुपी झाडावर येणारी फळे म्हणजे वेगवेगळे क्षण ज्यांच्या अस्तित्वाने आपले जीवन अर्थपूर्ण होत जाते . जसे कोणत्या झाडावर कोणते , कोणत्या आकाराचे , कोणत्या चवीचे फळ यावे हे त्या झाडाच्या संगोपन प्रक्रीयेवर , त्या झाडाला मिळणाऱ्या किंवा न मिळणाऱ्या पोषक तत्वांवर , त्या झाडाला मिळालेल्या जमिनीच्या प्रकारावर , त्या झाडाला मिळणाऱ्या खतपाण्यावर तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे त्याला मिळणाऱ्या वातावरणावर अवलंबून असते तस्सेच काहीसे माणसाच्याही जीवनाचे आहे . म्हणूनच ग