Posts

Showing posts with the label मेट्रीक्स एम्पॉवरींग (३)

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.06.23

Image
मेट्रीक्स एम्पॉवरींग ( ३ ) मागच्या शतकात येऊन गेलेल्या मेट्रीक्स नावाच्या सिनेमातील एका अद्भुत संकल्पनेबद्दल आपण सध्या चर्चा करतो आहे आणि त्यावेळी फॅन्टसी वाटणारी ती संकल्पना खरी होते की काय अश्या भितीच्या उंबरठ्यावर आपण पोहोचलो आहोत . आर्टीफीशीयल इंटेलीजन्सच्या एका नव्या मायाजाळात आपण अडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे . आपल्या शारीरिकच नव्हे तर मानसिक क्षमतांवर देखील आता यंत्र आरुढ होण्याची स्थिती निर्माण होते आहे . याचे एकच उदाहरण खालील प्रमाणे .. पाचव्या वर्गातल्या मुलाला इंग्रजीमधे मदर म्हणजेच आई या विषयावर मॅडम निबंध लिहायला सांगतात . त्या त्याला मॅडम निबंध कसा लिहायचा , त्याची सुरुवात कशी करायची , त्यामधे विषयाची मांडणी कशी करायची , सोबतच आई सारख्या विषयावर निबंध लिहीताना आईचे आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचे स्थान या सर्व बाबींबद्दल माहिती देतात . चांगल्या मॅडम असल्या तर त्या मुलांना सांगतात की आज घरी जायचे , घरी आपली आई आपल्या परीवाराकरीता आणि विशेषतः तुमच्य...