थोडा है थोडे की जरुरत है @ 06.06.23
पुन्हा एकदा … मेट्रीक्स !!( १ ) आजपासून बरोबर २५ वर्षांपूर्वी कियान्यू रीव्हज नावाच्या एका हॉलीवुड अभिनेत्याचा एक मेट्रीक्स नावाचा चित्रपट फार गाजला होता . पुढे त्याचे भाग देखील आले . ते देखील लोकप्रीय ठरले . २५ वर्षांपूर्वी फॅन्टसी वाटणारा तो चित्रपट आज बघितला तर त्याला वास्तववादी म्हणावे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे . काल परवा एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीवर एक बातमी ऐकली . त्यामधे एका नव्या तंत्रज्ञानामुळे मानवाच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होईल की काय अशी भिती काही वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे . मला ती बातमी ऐकल्यावर १९९९ सालचा तो मेट्रीक्स चित्रपट आठवला ज्यात मानवजातीच्या आपण सध्या करीत असलेल्या चुकांमुळे एक भयावह प्रकार घडलेला दर्शविला आहे . त्या चित्रपटात असे दाखविण्यात आले आहे की मानवाने तंत्रज्ञानाचा वापर एवढा जास्त वाढविला की तंत्रज्ञानाने स्वतःच्या पद्धतीने विचार करणे सुरु केले . खरे तर यंत्र स्वतःचा विचार करु शकत नाही . परंतू त्याला स्वतःचा विचा...