थोडा है थोडे की जरुरत है @ 16.03.21
प्रेमस्वरुप आई , आई स्वरुप बाबा आपल्या परीवारासोबत आपण बाहेर जात असतो . शहरातल्या एखाद्या गर्दीच्या चौकामधे आपली गाडी थांबते . गर्दीचा चौक असल्यामुळे बराचवेळ त्या ठिकाणी थांबावे लागते . गाड्यांच्या धुरांपासून किंवा कर्कश हॉर्नस् पासून वाचण्यासाठी आपण गाडीतील एअर कंडीशनर सुरु केलेला असतो आणि मुलांच्या आवडीचे एखादे गाणे त्यावर सुरु असते . अश्यावेळी गाडीच्या बाहेर काचावर एक दहा - अकरा वर्षांची मुलगी टकटक करुन आवाज करते . आपण सर्वचजण तिच्याकडे बघतो . दहा वर्षांची ती मुलगी आपल्याला एक - दोन रुपये मागत असते . वेळ असल्याने आपण तिचे निरीक्षण करतो . तिच्या अंगावरचा फ्रॉक जागोजागी फाटलेला असतो . तो फ्रॉक फाटलेला आहे याची तिला पण जाणीव असते म्हणून फाटलेल्या त्या कपड्यातून आपले अंग दिसू नये म्हणून ती पण प्रयत्न करीत असते . परंतू तिचे प्रयत्न तुटपुंजे असतात कारण तिचे कपडे फारच जास्त फाटलेले असतात . त्या चिमुकलीचे बारकाईने निरीक्षण केल्यावर आपल्या असेही लक्षात येते की ती बिचारी स...