Posts

Showing posts from October, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
दिवाळीची विशेष आवरासावर या दिवाळीच्या निमित्ताने कोणतेही कार्यक्रम ठरवू नका, मला घराच्या आवरासावरीसाठी मदत हवी आहे असा आदेश मला गृहखात्याकडून प्राप्त झाला व त्यामुळे त्या आदेशाबरहुकूम मी कामावर हजर झालो. एरवी इतरांना कामे सांगून व्यवस्था चालविणे हेच माझे काम असले तरीदेखील या हुकुमासमोर मला माझा नेहेमीचा पवित्रा सोडून भव्य आवरासावर करण्यासाठी सज्ज व्हावे लागले. या असल्या आवरासावरीचे प्रकार सध्या दिवाळीनिमीत्त सर्वच घरांमधून सुरु आहेत. हे काम फारच वेगळ्या प्रकारचे असते. ही कामे करण्याचे कॉपीराईट गृहखात्याकडे असतात. त्यांच्या काही पद्धती वर्षानु वर्षे किंवा पिढ्यान पिढ्या ठरलेल्या असतात. या खास पद्धती खास करुन महिलांच्याच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरीत केलेल्या असतात. त्याच पद्धतींनुसार आपल्याला ती कामे करावी लागतात. कामकरी वर्गांचे अधिकार देखील पुरुषांच्या पिढ्या हस्तांतरीत करीत असतात. त्यामधे आपण आपल्या विचारानुसार विचार किंवा सल्ले द्यायचे नसतात. निमूटपणे आज्ञांचे पालन करावयाचे असते. उदाहरणच द्यायचे झाले तर अस्मादिकांचेच देता येईल. प्राचार्य म्हणून एखाद्या महाविद्यालयाचे संच

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
थकलेली अंबाबाई या वर्षी दसऱ्याचा दुसरा म्हणजे मोहरमचा दिवस. जवळपास अकरा दिवसांनंतर मी अंबामातेच्या मंदीरासमोरील रस्त्यावरुन माझ्या महाविद्यालयात निघालो होतो. गेले दहा बारा दिवस हा रस्ता नवरात्रीमधील भक्तांच्या अलोट गर्दीमुळे बंद करण्यात आला होता. दहा दिवस या रस्त्यावर पादचारी भक्तच ये जा करीत होते. वाहनांना परवानगीच नव्हती. संपुर्ण रस्त्याच्या दोन्ही कडेला वेगवेगळी दुकाने, रस्त्याने वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून भक्तगणांच्या स्वागतासाठी मोठमोठ्या कमानी उभारण्यात आल्या होत्या. रोषणाई करण्यात आली होती. अंबामातेचे मंदीरही रोषणाईने सजविण्यात आले होते. वर्षातून एकदाच नवरात्रीचा सण साजरा केला जात असल्याने संपुर्ण सोहळा दिमाखदार करण्यात आला होता. दिवसभर वेगवेगळ्या गावांवरुन व मूळ अमरावतीचेही अनेक भक्तगण देवीच्या दर्शनासाठी येत होते. पहाटे पाचला उठून, अनवाणी पाच पाच किलोमीटर चालत, नऊ दिवसांचे कडकडीत उपवास करुन मोठ्या भक्ती भावाने हे दर्शन घेणे सुरु होते. काहींनी तर सलग दहाही दिवस सकाळ संध्याकाळ मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सकाळच्या काकड आरतीपासून ते रात्रीच्या शेज आरतीपर्यंत अंबामाता आपल्

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
बापालाही मन असतं मागल्या आठवड्यात माझी स्कुटर सर्विसींग करण्यासाठी मी शोरुमला घेऊन गेलो होतो. लवकर नंबर लागावा म्हणून अगदी सकाळीच मी तेथे पोहोचलो. माझ्यासोबत अजूनही काही मंडळी तेथे स्कुटरच्या सर्विसींग करीता आले होते. परंतू एक व्यक्ती मात्र वेगळ्या कारणासाठी तेथे आली होती. ग्रामीण भागाला शोभेल असा पोशाख, त्याच पद्धतीचे किंचितसे भांबावलेपण, हातात झोरा (ज्याला शहराच्या मराठी भाषेत बॅग असे म्हणतात), तो झोरा हातात घट्ट पकडलेला व चेहेरा जरा चिंताक्रांत अश्या स्वरुपाचा तो माणूस अस्वस्थपणे येरझारा करीत होता. त्याला खरे तर शोरुम मधे काम होते, परंतू तिकडची मंडळी आलेली नसल्याने तो सर्विसींग विभागातच तेथील लोकांशी बोलत बसला होता. शोरुम उघडायला अजून वेळ आहे, तुम्ही खूपच लवकर आले असे त्या लोकांनी त्या माणसाला सांगितले. दादा, वेळ नाही झाला पायजे.. म्हनून पायटीच निंगालो गावाकडून, गाडी लवकरच आली..म्हनून येऊन गेलो.. आज आपलं काम झालं पायजे..आजचा दिवस गाठायचा म्हनून तर सारी धावपळ केली.. आज काम झालंच पायजे...पैशे सारेच घेऊन आलो मी..आता चिंता नाई...ठरल्यासारखं सारं झालं म्हंजे जमलं...अश्या पद्धतीच्या त्य

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
सो व्हॉट सो व्हॉट हा इंग्रजी भाषेतील उद्गार बरेच वेळा मुक्त विचारसरणीचे द्योतक मानला जातो. मी एखादी कृती करतोय व ती कृती समोरच्या व्यक्तीला त्याच्या मनातील सांस्कृतिक किंवा सामाजिक चौकटीच्या पलीकडची वाटल्याने माझ्या कृतीवर जेव्हा आक्षेप घेतला जातो तेव्हा माझ्या दोन प्रकारच्या प्रतिक्रीया राहू शकतात. एक तर मला तो आक्षेप पटू शकतो व माझी चूक लक्षात आल्यामुळे मी -आय ॲम सॉरी - हा उद्गार काढतो. दुसऱ्या बाजूने माझी कृती मला स्वतःला योग्य वाटते व त्या कृतीबद्दल मी मनापासून समाधानी असेल तर मग केवळ समोरच्या व्यक्तीच्या चौकटीत ती बसत नाही म्हणून मी त्या व्यक्तीचा आक्षेप स्विकारणार नाही व त्या आक्षेपाबाबत - सो व्हॉट- असा उद्गार काढून माझा विरोध नोंदवीन. या -सो व्हॉट- उद्गाराचे एक आणखी वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे हा उद्गार काढण्यासाठी आत्मविश्वास लागतो. स्वतःचे स्वतः बद्दल कोणतेही ठाम मत नसलेल्या व दुसऱ्यांच्या विचारांनी आपल्या जीवनाच्या दिशा सहजच बदलविणाऱ्या पापभिरु व्यक्ती असा आत्मविश्वासाने भरलेला उद्गार कधीच काढू शकणार नाही. माझ्या जीवनातील निर्णय माझे आहेत, ते मी माझ्या मेंदुमधे सकारात्मकतेने क