थोडा है थोडे की जरुरत है @ 12.01.21
योगदान तो दिवस प्रचंड ताणाचा होता . खरे तर सकाळपासूनच ताण सुरु झाला . आधल्या दिवसापर्यंत सारे या दिवसाची तयारी करीत होते . काळ वेळाचे भान उरले नव्हते . टास्क अतिशय मोठा आणि नेहेमीपेक्षा सर्वस्वी वेगळा होता . परीस्थीती फारच अपेक्षितपणे वेगळी निर्माण झाल्यामुळे हा सारा बदल करावा लागला होता . शिवाय अनेकजण याच्या परीणामांशी संबंधित असल्याने काळजी होती . प्रत्येक गोष्ट सर्व पातळ्यांवर तपासणे सुरु होते . रात्री उशीरापर्यंत सर्व संबंधित लोक डोळ्यात तेल घालून सर्व गोष्टी बारकाईने बघत होते . त्यांच्यासोबत अधिकारी मंडळी देखील सर्वांकडून प्रत्येक गोष्ट नीट तपासलीय की नाही याची खात्री करुन घेत होते . आधल्या दिवशी रात्री १ वाजता त्या इमारतीसमोर उभे राहून तेथील प्रमुख म्हणाले उद्याचा दिवस आपल्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचा आहे . आपल्या सर्वांचीच परीक्षा आहे . सारे ठीक झालेय , अनेक वेळा तपासून झालेय असे मनाला समजावीत प्रत्येकजण घरी गेला . त्याने पण आपल्या प्रमुखांचे हे वाक्य ऐकले . सार...