Posts

Showing posts from February, 2024

थोडा है थोडे की जरुरत है @ 27.02.23

Image
बाबांचा पगार झाला नाही … आर्थिक नियोजन ही बाब सध्याच्या काळात एवढी महत्वाची आहे की त्याची सवय आपल्या मुलांना फार लवकर लावणे ही काळाची गरज आहे असेच म्हणावे लागेल . आपल्याला मिळणारा पैसा योग्य रीतीने व जपून कसा वापरायचा याचे प्रशिक्षण मुलांना देणे फार गरजेचे आहे . काही पालकांचा या बाबत जरा वेगळा दृष्टीकोन असतो . वरकरणी व भावनिकदृष्ट्या ते योग्य वाटत असले तरी देखील त्याचे दूरगामी परीणाम फार योग्य नसतात . काही पालकांचे म्हणणे असते की त्यांच्या लहानपणी त्यांना आर्थिक सबळता नव्हती व त्यामुळे फार गरीबीत दिवस काढावे लागले . परंतू आता सुदैवाने परीस्थिती सुधारल्यामुळे मी जे भोगले ते माझ्या मुलांना भोगण्याची पाळी यायला नको . म्हणून दर महिन्याला हजारो रुपये वापरण्याची क्षमता असलेले क्रेडीट कार्ड त्यांनी मुला मुलींना दिलेले असते . क्रेडीट कार्ड वापरून फटाफट खरेदी करताना त्या तरुण मुलाला किंवा मुलीला त्या पैश्याचे मोल कळलेले नसते व परीणामतः त्यांना अडचण म्हणजे काय किंवा

थोडा है थोडे की जरुरत है @ 20.02.24

Image
अभी जो है …. एका डोंगरी किल्ल्याच्या कड्यावर ती शांतपणे बसलेली असते . समोर विस्तिर्ण पसरलेला भुभाग , त्याच्या पुढे त्याहीपेक्षा जास्त मोठ्या आकाराचे जंगल व त्यानंतर क्षितीजावर अस्ताला जाणारे सूर्यबिंब . त्या सूर्यास्ताच्या वेळी साऱ्या भुभागावर पसरलेले गडद केशरी रंगाचे आवरण समोरच्या निसर्ग सौंदर्यात मोठी भर घालत होते . सायंकाळची अशी कातरवेळ मनाला हुरहुर तर लावतेच परंतू दिवसभर धावून धावून थकलेल्या मनाला शांत देखील करते . अशी ती शांत बसून तो अप्रतिम सूर्यास्त बघत असतानाच तो धावत धावत येतो व तिचा हात धरून तिला उठवतो . तो तिला म्हणतो , चल चल पटकन चल , तिकडे किल्ल्याच्या आतमधे लाईट ॲन्ड साऊंड शो सुरु होतो आहे . मी तिकिटे काढली आहेत . पटकन चल . तो शो मीस नको व्हायला . सूर्यास्ताच्या त्या विलोभनीय दृष्य विलक्षण भारावलेली ती , अलगद त्याचा हात सोडवते व त्याला म्हणते , तो लाईट ॲन्ड साऊंड शो बघायला गेली तर हे समोर दिसतेय ते सुंदर दृष्य मी गमावेन त्यामुळे मी येथेच बसणार .