Posts

Showing posts from September, 2019

थोडा है थोडे की जरुरत है @01.10.19

Image
खड्डा भरणे सुरु झालेय ! आज १ ऑक्टोबर . आजचा दिवस माझ्याकरीता अतिशय महत्वाचा आहे . आजच्याच दिवशी तेवीस वर्षांपूर्वी मी माझ्या आई वडीलांच्या आशिर्वादाने आणि माझ्या गुरुंच्या मार्गदर्शनामुळे या उच्चशिक्षण क्षेत्रात शिक्षक म्हणून प्रवेशित झालो होतो . तेवीस वर्षांपूर्वी मी आमगावच्या भवभूती महाविद्यालयात माझ्या इंग्रजीचा पहिला तास घेतला होता . गेले तेवीस वर्षे या क्षेत्रात प्रामाणिकपणे कार्य करण्याचे जे वचन मी माझ्या याच क्षेत्रात मोठे योगदान दिलेल्या वडीलांना दिले होते त्या वचनाला जागण्याचा प्रयत्न करीत राहीलो . ज्येष्ठांच्या मार्गदर्शनामुळे नेमून दिलेल्या कामाच्या पलीकडे बघण्याची सवय लागली व तेव्हापासूनच विद्यार्थ्यांच्या खाजगी मनोजगतात जसे जमेल तसे डोकावून , त्यांना बोलते करुन , त्यांचे मन जाणण्याचा प्रयत्न करीत राहीलो . परंतू एका वर्षाच्या आतच काही अनुभव असे आले होते की ज्या शिक्षण व्यवस्थेचा मी पुढील अनेक वर्षे भाग बनणार होतो त्यामधील केंद्रबिंदू असलेल्या विद्यार्थ्यांचा