Posts

Showing posts from December, 2017

थोडा है थोडे की जरूरत है @ 26.12.17

Image
व्यवस्थेचे भय … कुणाला ? त्या दिवशी माझ्या महाविद्यालयात अचानक दोन पोलीस आले . आजकाल विविध कारणांसाठी पोलीस येऊ लागलेत . महिलांबाबत घडणाऱ्या गुन्ह्यांसंदर्भात समुपदेशन करण्यासाठी तर मुलींचे महाविद्यालय असल्यामुळे नेहेमीच पोलीस अधिकारी येत राहतात . याशिवाय मुलींना सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टीने वारंवार त्यांना भेटी द्याव्या लागतात . एकंदरीत पोलीस महाविद्यालयात येणे ही आता सामान्य बाब झाली आहे . परंतू असे असताना देखील पोलीस आले म्हणल्यावर ज्या प्रकारच्या प्रतिक्रीया उमटतात त्याची मोठी गंमत असते . मी त्या दिवशी एक सभा घेत होतो . सभा सुरु असल्याने मला भेटायला आलेली काही मंडळी अभ्यागत कक्षात बसलेली होती . तेवढ्यात हे दोन पोलीस आले . त्यांना बघितल्याबरोबर माझ्या सहायक भगिनीने त्वरीत मला माझ्या कक्षात येऊन सभेच्या मधेच सूचना केली की दोन पोलीस आलेत . मी तिला सांगितले की त्यांना थांबायला सांग कारण माझी सभा सुरु आहे . तिला ते उत्तर अपेक्षित नव्हते . ती क्षणभर थांबली कारण पोल