थोडा है थोडे की जरुरत है @ 03.05.22
गुंता सोडवण्याची पद्धत आता ती आजी नेमका गुंता कसा सोडवायचा हे ऐकण्याकरीता उत्सुक होती . मी तिला सांगितल्याप्रमाणे गुंता सोडविण्याकरीता एक टोक तिने माझ्या हातात दिले असल्याने आपल्या एकंदर वागण्यामधे किंवा कृतींमधे बदल करण्याची तिच्या मनाची तयारी झाली होती . कारण गुंता सोडविण्याच्या प्राथमिक तयारीमधला तो भाग आहे . आपल्या विचारप्रक्रीयेपेक्षा वेगळा विचार असू शकतो किंवा आपल्यालाही कधीतरी सुधारण्याची गरज भासू शकते हे मान्य करणे ही या प्रक्रीयेमधील मधील पहिली पायरी आहे . कारण वयानुसार स्वतःबद्दलची तसेच इतरांबद्दलची मते पक्की झालेली असतात व सोबतच मी जो विचार करतो तोच सर्वात बरोबर विचार आहे अशी एक धारणा अजाणतेपणी का होईना परंतू तयार होते . त्यामुळे नवे काहीतरी आपल्या मनाच्या विरोधातले ऐकण्याकरीता ते गुंत्याचे टोक दुसऱ्याच्या हातात द्यावे लागते . शेवटी लोक कौन्सेलरकडे कशाला जातात तर त्यांना त्यांच्या समस्या स्वतःहून सोडविता येत नसतात म्हणून ही बाह्य मदत घ्यावी लागते . हे...