दै. तरुण भारत नागपूर मधे आज प्रकाशित झालेला माझा लेख
एक नवी कल्पक गुंतवणूक पहाटे वॉकला जाताना मी फ्लाय ओव्हरवरुन जात होतो. नेहेमीचा रस्ता असल्याने परीचित मंडळींच्या भेटी झाल्या. पण त्या दिवशी एक वेगळा प्रकार मला बघायला मिळाला. माझ्या बाजूने दोन वीशीतले तरुण गाडी चालवित जरा पुढे गेले. त्यांनी काही अंतरावर गाडी लावली. पुलावर अशी गाडी थांबविल्याने माझ्या मनात जरा कुतुहल निर्माण झाले. त्या दोघांनीही आपापल्या बॅग्जमधून कॅमेरे बाहेर काढले व ते दोघेही उगवत्या सूर्याची छायाचित्रे घेऊ लागले. वेगवेगळ्या अँगलचा, पोझीशन्सचा वापर करुन त्यांनी उगवत्या सूर्याची, आसपास उडणाऱ्या कबुतरांची वेगवेगळी छायाचित्रे काढली. ते दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी होते व आजच्या युवापिढीला शोभणारेच कपडे त्यांनी परीधान केलेले होते. पण दोघांचाही फोटोग्राफीचा सेन्स मात्र खूप चांगला होता हे त्यांच्या चर्चेवरुन जाणवित होते. मी मुद्दाम त्यांच्याजवळ घुटमळलो तेव्हा त्यांनी मला ती सर्व छायाचित्रे दाखविली. मलाही फोटोग्राफीची खूप आवड असल्याने मी त्या सर्व छायाचित्रांचे अवलोकन केले. अप्रतिम छायाचित्रे होती ती. महत्वाचे म्हणजे त्या छायाचित्रांमधील बारीक बारीक गोष्टी ते सांगत होते....