थोडा है थोडे की जरुरत है @ 05.04.22
दान तो एप्रील महिनाच होता . ५ तारीखच होती . वर्ष २०१४ . त्या दिवशीची पहाट मी आयुष्यात विसरु शकत नाही . पहाटे ४ . ३० दरम्यान एका दवाखान्याच्या बेंचवर झोपलो असताना मला एक नर्स उठवायला आली व त्यानंतर तिने जे सांगितले ते ऐकणे माझ्यासाठी व माझ्याकरवी माझ्या परीवारासाठी अतिशय वेदनादायी होते . आमच्या घराचा आधार , आमच्या सर्वांची सकारात्मक उर्जा , आमच्या सर्वांचे सांभाळकर्ता , आमच्या घराचा आधारवड , आमचे दादा आम्हाला सोडून गेले . त्यांचे जगणे जेवढे सहज तेवढेच त्यांचे जाणे देखील . काहीही त्रास नाही , दवाखान्यात भरती होण्याची आयुष्यातील पहिली नि शेवटची वेळ , अगदी शेवटच्या दिवसापर्यंत घरच्या अंगणातील झाडांना स्वतः पाणी घालून ते गेले … ते कायमचे . आयुष्यभर अत्यंत निस्पृह जीवन जगून त्यांनी आदर्श शिक्षक कसा असावा हा वस्तुपाठच घालून दिला होता . परंतू त्यांच्या काही गोष्टी परीवारातील कुणालाही किंवा कुठेही जाहीरात न करता घडल्या व त्या त्यांच्या मृत्यूपश्चातच आम्हाला समजल्या . निवृत्तीपश्चात ...