Posts

Showing posts from July, 2021

थोडा है थोडे की जरुरत है @ 27.08.21

Image
पाऊस दोन दिवसांपूर्वी अमरावती शहरात झालेल्या मुसळधार पावसातील गोष्ट . सध्या संपुर्ण महाराष्ट्रात पावसाचा धुमाकुळ सुरु आहे . त्यामधून आमचे अमरावती देखील सुटले नाही . दोन दिवसांपूर्वी सायंकाळी आभाळ चारही बाजूने भरून आले व धोधो पाऊस कोसळायला लागला . मी विद्यापीठात कामानिमित्त बराच उशीरापर्यंत थांबलो होतो व साधारण सात वाजताच्या सुमारास मी घरी जायला निघालो . नेहेमीच्या फ्लाय ओव्हरच्या मार्गावरून न जाता मी जरा वेगळा मार्ग निवडला . तो मी का निवडला हे मला माझेच कळले नाही . पण एक वेगळ्या प्रकारची घटना माझ्यासोबत घडणार होती म्हणून कदाचीत तसे घडले . योगायोग असावा . पाऊस प्रचंड जोरात कोसळत असल्याने मी गाडी जरा हळू हळूच चालवित होतो . गाडीचे वायफर्स सर्वात जास्त वेगाने फिरत होते . परंतू पाऊस एवढा जोरात होता की त्या वायफर्स ला देखील पावसाचे थेंब जुमानत नव्हते . कसाबसा मी त्या वाफर्सच्या राऊंडमधून रस्ता शोधत निघालो होतो . शेटवटी मी गाडीचे दिवे देखील लावले . पाऊस एवढा जोरात होता