Posts

Showing posts with the label योद्धे

थोडा है थोडे की जरुरत है @ 24.03.2020

Image
योद्धे तो सैन्यदलामधे अधिकारी म्हणून रुजू झाला याचा काकांच्या चेहेऱ्यावर केवढा आनंद होता ! त्यांच्या जीवनातील सर्वात मोठे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे त्यांना वाटत होते . आयुष्यात अनेकवेळा क्षमता असूनही संधी न मिळाल्यामुळे मागे रहावे लागलेल्या आणि क्षमता नसणाऱ्यांना पुढे जाताना बघून स्वतःला कायम समजावत राहिलेल्या काकांकरीता तो एक अपूर्व क्षण होता . मुलाच्या पासींग आऊट परेडच्या दिवशीचा , त्याच्या खांद्यावरचे बॅज उघड करतानाचा फोटो मला दाखविताना त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले होते . बारकाईने बघताना त्या फोटोतही काकांच्या व काकुंच्या डोळ्यात ते स्पष्ट दिसत होते . आपली स्वप्ने , आपले संस्कार , आपली मते , आपले सामाजिक स्थान , आपली शिकवण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपला स्वाभिमान या सर्व गोष्टींचा आदर राखीत आपल्या मुलाने त्यामधे इतकी मोठी भर टाकली की त्या क्षणी काका नि काकू आयुष्यातील सर्वोत्तम आनंदाचा क्षण अनुभवत होते . त्यांच्या समवेत अनुभवलेल्या आनंदाच्या क्षणांनंतर साधारण एख...