थोडा है थोडे की जरुरत है @ 09.03.21
कुणीतरी संवेदनशील हवं ! आज मला फार आनंद झालाय . आज कित्येक दिवसांनंतर मला फार मोकळे वाटतेय . किती प्रतिक्षा , किती ताण सहन केलाय गेले काही दिवस . तुला हे सारे ठाऊक आहे . पण आज खरोखरीच माझ्या साऱ्या परीश्रमाचे फलीत झाल्यासारखे वाटतेय . हा सारा काळ कसा गेला काय सांगू ? खरे तर ही गोष्ट मला करता येत नव्हती म्हणून एक प्रकारचा न्यूनगंडच निर्माण झाला होता माझ्या मनात . आपल्याला हे का जमू नये जे इतर साऱ्यांना जमतेय . जसे जसे अपयश यायला लागले तसे तसे माझा आत्मविश्वास देखील डळमळायला लागला . पण शेवटी निर्धार केलाच की प्रयत्न सोडायचे नाही . कुणी काहीही म्हणोत मी हे केल्याशिवाय राहणार नाही . कधी कधी तर सारख्या अपयशाने असे वाटायचे की जाऊ द्या सोडून द्यावे , प्रत्येकाला सारेच जमले पाहीजे असे थोडीच आहे ? पण परत मनातला तो सूप्त विचार उफाळून यायचा की का नाही जमणार , जमायलाच हवे . एक दोनदा कुणाला सांगण्याचा प्रयत्न केला , परंतू मला उत्तर मिळाले , काय मॅडपणा चालवलास ? या असल्या ...