Posts

Showing posts with the label समाधानाची चावी… एक प्रश्न!!

थोडा है थोडे की जरुरत है @ 18.04.23

Image
समाधानाची चावी .. एक प्रश्न !! माझ्या मित्राचा फोन आला व त्याने सांगितले की आम्ही बाबांची दुसरीकडे स्वतंत्र व्यवस्था करतो आहे . आता आम्ही त्यांना सोबत ठेवू शकत नाही . किती सहन करायचे यार ? काय काय नाही करत आम्ही सारेच त्यांच्यासाठी . त्यांच्या मतानुसार सारेच करतो . परंतू ते मात्र प्रत्येकाचा केवळ अपमान करतात . ते कुणाचेही ऐकूनच घेत नाहीत . कसे करावे काही सुचत नाही . त्यांच्या या असल्या वागण्यामुळे आता आम्ही सर्व वेडे व्हायचे शिल्लक आहोत . तू म्हणालास त्या प्रमाणे आम्ही त्यांच्या कलाने वागणे सुरु केले . त्यांच्यासाठी आम्ही आमचे कार्यक्रम बदलले . त्यांच्या आवडी निवडी लक्षात ठेऊन सारे काही करतो पण हे मात्र त्यांच्या भूतकाळातून बाहेरच यायला तयार नाहीत . काहीही झाले की माझ्या काळात असे होते , माझ्या काळात तसे होते . आम्ही असे करत होतो , आम्ही तसे करत होतो . आम्ही एवढ्या वयात हे केले , ते केले . पण त्यांनी त्यांच्या ज्या वयात कर्तृत्व गाजविले असे त्यांना वाटते त्याच्या दुप...