Posts

Showing posts from February, 2016

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
जीवनानुभवाची सहल परीसरातील मुलींनी ठरविले की सहलीला जायचे. केवळ मुलींनीच जायचे. त्या गटात काही मुली वयाने मोठ्या असल्याने त्यांनी सर्वांची काळजी घेण्याचेही आश्वासन दिले. आई वडीलांनी देखील परवानगी दिली. शेवटी मुलींनाही स्वतंत्रपणे काही गोष्टी करता यायला हव्यातच हा विचार सर्वांनी केला. त्या गटात अबोली देखील होती. इयत्ता सातव्या वर्गात शिकणारी लहानगी पोर. ती देखील या गटाचा अविभाज्य भाग होती. रोजचे परीसरातील खेळ, लपाछपी, गोंधळ, सणासुदीला नटणे वगैरे सर्वच वेळेला या गटासोबतच असणारी अबोली. आपल्या सर्व मैत्रीणी काही तायांसोबत सहलीला जाणार म्हणल्यावर त्या पोरीचे डोळे चमकले. बऱ्याच दिवसांनंतर अशी सहल होणार होती. शिवाय आई बाबांशिवाय म्हणजे आणखी मजा करायला मिळणार असा विचार तिच्या मनात आला. खरे तर सर्वच मुलींच्या उत्साहाला उधाण आले होते कारण आई बाबांव्यतिरिक्त ही त्यांची पहिली सहल होती. सर्व प्रकारचे स्वातंत्र्य मानवाला उत्साही बनविते हा नियमच आहे मग ते देशाचे स्वातंत्र्य असो किंवा केवळ मुलींच्या समुहाला पालकांव्यतिरीक्त सहलीला जाण्याची परवानगी असो. सर्वच मुलींनी एकत्रीतपणे सहलीच्या आयोजनाबाबत बै

My article published in Hindusthan daily today under my column थोडा है थोडे की जरूरत है

Image
शस्त्रांचा वापर.. बुद्धीने व काळजीपूर्वक परवा लहान मुलांसाठी टी.व्ही.वर दाखविला जाणारा एक चित्रपट - नार्निया - बघत होतो. त्या चित्रपटात चार मुले एका मोठ्या घरातील कपाटातून थेट नार्निया प्रदेशात पोहोचतात जेथील मूळ रहीवासी एका आकाशवाणीनुसार याच मुलांची वाट बघत असतात. सुरुवातीच्या आश्चर्यानंतर ही मुले त्या मूळ रहीवाश्यांना एका जुलमी राणीच्या कटचाट्यातून सोडविण्यासाठी तयार होतात. त्यावेळी सांताक्लॉज त्यांना भेटस्वरुपात काही आयुधे देतो. त्यातील सर्वात मोठ्या मुलाला, पीटरला तो एक प्रभावी तलवार भेट देतो. ती तलवार म्यानेतून बाहेर काढून पीटर त्याकडे बघतो तेव्हा तलवार हातात घेतल्यावर शस्त्र हातात आल्यानंतरची चमक त्याच्या चेहेऱ्यावर बघून सांताक्लॉज त्याला सांगतो - बेटा हे शस्त्र आहे, ते बुद्धीने व काळजीपूर्वक वापरावे लागेल. चित्रपट पुढे सरकत राहीला आणि माझे मन त्या वाक्यापाशीच घुटमळत राहीले. खरोखरीच शस्त्र ही गोष्ट जेव्हा सर्वात पहिल्यांदा बनली असेल तेव्हा कदाचित मानवाने स्वतःचे संरक्षण करण्यासाठीच वापरली असणार. याचे प्रमुख कारण असे वाटते की माणूस वस्तुतः शांतीप्रीय प्राणीच आहे. त्याला आपले स्व

थोडा है थोडे की जरूरत है article published in Hindusthan daily today

Image
महा(न)माना त्या दिवशी एका वृत्तवाहिनीवर मनाला प्रसन्नता देणारी एक बातमी बघितली. भारतीय रेल्वेच्या प्रवासातील एक नवे पाऊल असा उल्लेख करणारी ती बातमी होती. भारतीय रेल्वे द्वारे नव्या व आधुनिक भारताला शोभेल अश्या पद्धतीची एक नवी गाडी सुरु केली. पंतप्रधानांनी स्वतः या गाडीला हिरवी झेंडी दाखवून सर्वप्रथम रवाना केले. स्वतः पंतप्रधान या समारंभाला हजर होते म्हणजे ती गाडी विशेष असावी असे त्या बातमीच्या सुरुवातीलाच वाटले. संपुर्ण बातमी बघितल्यानंतर खरोखरीच भारतीय रेल्वेने उचललेल्या या नव्या पावलाचे मनापासून कौतुक वाटले किंबहुना अभिमान वाटला. पंतप्रधानांनी उद्घाटित केलेल्या त्या गाडीचे नाव आहे. महामाना एक्सप्रेस. ही गाडी नवी दिल्ली ते वाराणशी या मार्गावर धावते आहे. रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन ही आधुनिक गाडी बनविली आहे याची ती बातमी बघितल्यावर जाणीव झाली. नव्या व आधुनिक पद्धतीचे कोचेस, त्याची अत्यंत सुरेख रंगसंगती, प्रत्येक सीटजवळ मोबाईल किंवा तत्सम उपकरणे चार्ज करण्याची व्यवस्था, नव्या पद्धतीची स्वच्छतागृहे, खाली सुंदर कार्पेट, एसी वर्गाच्या डब्यांमधे वरच्या बर्थवर चढण्यासाठ